हिमाचल प्रदेशमध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 06:19 PM2018-04-09T18:19:21+5:302018-04-09T20:20:42+5:30

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात असलेल्या नुरपूरमध्ये दरीत स्कूल बस कोसळून 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना सोमवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.  

School bus collapses in Himachal Pradesh, four students die | हिमाचल प्रदेशमध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशमध्ये स्कूल बस दरीत कोसळली, 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू

googlenewsNext

कांगडा : हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात असलेल्या नुरपूरमध्ये दरीत स्कूल बस कोसळून 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना सोमवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.  




मिळालेल्या माहितीनुसार, कांगडा जिल्ह्यातील नुरपूर येथे 60 विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या बसचा 200 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफची टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरु आहे.  तसेच, जखमी विद्यार्थ्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 


मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले. 


हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करत न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. यावेळी जयराम ठाकूर म्हणाले की, या अपघाताची बातमी समजली, त्यावेळी मला नऊ मुलांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी एनडीआरएफची टीम तात्काळ दाखल झाली असून बचावकार्य सुरु आहे. स्थानिक लोकांकडून सुद्धा मदत करण्यात येत आहे. तसेच, या घटनेची चौकशीचे आदेश दिले आहेत. 



 

Web Title: School bus collapses in Himachal Pradesh, four students die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.