शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

Lakhimpur Kheri Violence: 'लखीमपूर प्रकरणाच्या तपासात यूपी सरकार मागे का हटतंय?', सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 14:02 IST

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारकडून लखीमपूर प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्यात झालेल्या दिरंगाईवरुन कोर्टानं सरकारची कानउघाडणी केली.

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारकडून लखीमपूर प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्यात झालेल्या दिरंगाईवरुन कोर्टानं सरकारची कानउघाडणी केली. न्यायाधीश एनव्ही रमन्ना म्हणाले की, काल रात्री १ वाजेपर्यंत आम्ही वाट पाहात होतो आणि प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट आम्हाला आत्ता मिळाला आहे. याआधीच्या सुनावणीवेळी आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की पुढील सुनावणीच्या कमीत कमी एक दिवस आधीच स्टेटस रिपोर्ट सादर केला जावा. पण तसं झालेलं दिसत नाही. 

उत्तर प्रदेश सरकारकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कोर्टासमोर संबंधित प्रकरणाचा प्रगती अहवाल सादर केला असून सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली. पण कोर्टानं सुनावणी टाळण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. सुनावणी टाळणं योग्य ठरणार नाही, असं सांगत खंडपीठाकडून कोर्टातच सरकारनं सादर केलेल्या रिपोर्टचं वाचन केलं जात आहे. 

फक्त चार आरोपींना अटक का?लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार मागे हटत आहे, असं रोखठोक मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं. या प्रकरणात तुम्ही फक्त ४ जणांची साक्ष का नोंदवली? इतर साक्षीदारांची साक्ष का नोंदवली नाही? फक्त ४ जणच पोलीस कोठडीत आणि इतर न्यायालयीन कोठडीत का? त्यांच्या चौकशीची गरज नाही का?, असे सवाल कोर्टानं उपस्थित केले. कोर्टानं प्रकरणाची सुनावणी २६ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. तसंच याप्रकरणाशी निगडीत साक्षीदार आणि पीडीतांचे जबाब नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय साक्षीदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्याही सूचना सरकारला केल्या आहेत. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय