शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

विजय मल्ल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा एसबीआयने केला इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:26 PM

फेब्रुवारी २0१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाऊन विजय मल्ल्या याच्या विदेश गमनावर कायदेशीर बंधन आणण्याचा सल्ला एसबीआयला देण्यात आला होता.

नवी दिल्ली : आर्थिक घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या मालकीच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाशी संबंधित खटल्यात आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्याचा स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) इन्कार केला आहे.किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज देणाऱ्या बँक समूहाचे नेतृत्व एसबीआयनेच केलेले आहे. किंगफिशरचे कर्ज थकल्यानंतर विजय मल्ल्या विदेशात पळून जाऊ शकतो, अशी भीती त्यावेळी जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत होती. याची दखल घेत फेब्रुवारी २0१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाऊन विजय मल्ल्या याच्या विदेश गमनावर कायदेशीर बंधन आणण्याचा सल्ला एसबीआयला देण्यात आला होता. परंतु तो सल्ला एसबीआयने मानला नाही.२ मार्च २0१६ रोजी विजय मल्ल्याने भारत सोडला. तो विदेशात पळून गेल्यानंतर चार दिवसांनी बँकेने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करून त्याला विदेशी जाण्यापासून रोखण्यात यावे, अशी विनंती केली. एसबीआयच्या या भूमिकेकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जात आहे.याप्रकरणी एसबीआयने एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, किंगफिशर एअरलाइन्ससह विजय मल्ल्यायांच्या विरोधातील सर्व कर्ज थकबाकीच्या प्रकरणात बँकेकडून अथवा बँकेच्या अधिकाºयांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला नाही. विजय मल्ल्याने भारतातील १७ बँकांच्या समूहाचे तब्बल ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. त्यावरून त्याच्याविरुद्ध अनेक खटले सुरू आहेत.थकबाकी असताना कर्ज कसे दिले?विजय मल्ल्या यांनी कर्जाच्या थकबाकीस आपण एकटेच जबाबदार नसून कर्ज देणाºया बँकाही जबाबदार आहेत, असा आरोप केला आहे. आपल्या कंपन्यांची स्थिती बँकांना माहिती होती.तरीही कर्जथकबाकीप्रकरणी आपल्याला एकट्यालाच जबाबदार धरून बँकांनी आपल्याला ‘पोस्टर बॉय’ केले आहे, असे मल्ल्या यांनी म्हटले आहे. दरम्यान, मल्ल्या यांना कर्ज दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही बँकांवर ताशेरे आढले आहेत. आधीची कर्जे थकलेली असताना मल्ल्या यांना पुन्हा कर्ज कसे काय दिले गेले, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याSBIएसबीआय