सत्येंद्र जैन यांचा तुरुंगात जेवणाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 06:44 IST2022-11-24T06:44:15+5:302022-11-24T06:44:29+5:30

जैन यांच्या तुरुंगातील आरामदायी जीवनाबद्दल भाजपने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बलात्काऱ्याकडून मसाज केल्यानंतर जैन स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

Satyendar Jain's video of eating in jail goes viral | सत्येंद्र जैन यांचा तुरुंगात जेवणाचा व्हिडीओ व्हायरल

सत्येंद्र जैन यांचा तुरुंगात जेवणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा एक नवीन व्हिडीओ भाजपने बुधवारी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सत्येंद्र जैन यांना बॅरेकमध्ये बेडवरच जेवण दिले जात असल्याचे दिसते. एक व्यक्ती सतत त्यांच्या सेवेत गुंतलेली दिसते. याआधी जैन यांचे अशाच प्रकारचे  चार व्हिडीओ समोर आले होते, ज्यामध्ये ते तुरुंगात मालिश करून घेताना दिसत होते.

जैन यांच्या तुरुंगातील आरामदायी जीवनाबद्दल भाजपने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, बलात्काऱ्याकडून मसाज केल्यानंतर जैन स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एखाद्या रिसॉर्टमध्ये सुट्टी घालवल्यासारखे वाटते.या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी व्हिडीओवर सत्येंद्र जैन यांच्या बाजूने भूमिका मांडली. जैन यांची तब्येत खराब असून डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी घेत असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

जेवण व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार -
जैन मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक झाल्यापासून तुरुंगात आहेत. सुनावणी सुरू असताना जैन यांच्या वकिलाने स्पष्ट केले की, त्यांना जेवण व उपचार योग्य पद्धतीने दिले नाही. त्यांचे वजन २८ किलोंनी घटले आहे.
 

Web Title: Satyendar Jain's video of eating in jail goes viral