निष्काळजीपणाचा कळस! रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडलाच नाही, रुग्णाने तडफडून सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 16:48 IST2026-01-26T16:48:03+5:302026-01-26T16:48:56+5:30

रुग्णालयाजवळ पोहोचूनही एका रुग्णाला रुग्णवाहिकेचा दरवाजा वेळेवर न उघडल्यामुळे आपला जीव गमवावा लागला.

satna patient dies inside ambulance as door gets jammed at hospital gate | निष्काळजीपणाचा कळस! रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडलाच नाही, रुग्णाने तडफडून सोडला जीव

निष्काळजीपणाचा कळस! रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडलाच नाही, रुग्णाने तडफडून सोडला जीव

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाजवळ पोहोचूनही एका रुग्णाला रुग्णवाहिकेचा दरवाजा वेळेवर न उघडल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. राम प्रसाद असं या मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव आहे. रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

रामनगर येथील रहिवासी असलेले ६७ वर्षीय राम प्रसाद सकाळी घराबाहेर शेकोटी पेटवून बसले असताना अचानक बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रामनगर सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी '१०८' रुग्णवाहिकेतून सतना जिल्हा रुग्णालयात (सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय) रेफर केलं.

रुग्णवाहिका राम प्रसाद यांना घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या गेटपर्यंत पोहोचली. मात्र, तिथे पोहोचताच रुग्णवाहिकेचा मागील दरवाजा जाम झाला. रुग्ण आत मृत्यूशी झुंज देत होता आणि बाहेर उपस्थित लोक लाथा-बुक्क्यांनी आणि अवजारांच्या साहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते. व्हिडिओमध्ये रुग्णवाहिका चालक खिडकीतून आत शिरण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर जेव्हा दरवाजा जबरदस्तीने उघडण्यात आला, तेव्हा राम प्रसाद यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

या घटनेनंतर आरोग्य विभागाने आपली बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला आहे. रुग्णाचा मृत्यू रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात झाला होता, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी मनोज शुक्ला यांनी जिल्हा समन्वयक अधिकाऱ्यांना नोटीस बजावून कारवाईचे आदेश दिले आहेत.

Web Title : लापरवाही की हद: एम्बुलेंस का दरवाजा जाम, मरीज ने तड़प कर तोड़ा दम

Web Summary : सतना: अस्पताल के पास एम्बुलेंस का दरवाजा जाम होने से मरीज की मौत हो गई। राम प्रसाद (67) ने दरवाजा खुलने का इंतजार करते हुए दम तोड़ दिया। अधिकारियों का दावा है कि उसकी रास्ते में ही मौत हो गई, जांच जारी है।

Web Title : Negligence Kills: Ambulance Door Jammed, Patient Dies Suffocating

Web Summary : Satna: A patient died after ambulance doors jammed near a hospital. Ram Prasad, 67, died struggling as rescuers failed to open the door in time. Officials claim he died en route, but an investigation is underway.