सासवडला पालखीनिमित्त आठवडे बाजार रद्द
By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST
सासवड : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. १२) सासवड येथे येत असून सोमवारी (दि. १३) सासवड येथेच मुक्काम आहे. येथून संत सोपानकाका व चांगावटेश्वर पालखीचे प्रस्थान सोमवारी होणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि. १३) असलेला सासवडचा आठवडा बाजार रद्द केला आहे.
सासवडला पालखीनिमित्त आठवडे बाजार रद्द
सासवड : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. १२) सासवड येथे येत असून सोमवारी (दि. १३) सासवड येथेच मुक्काम आहे. येथून संत सोपानकाका व चांगावटेश्वर पालखीचे प्रस्थान सोमवारी होणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि. १३) असलेला सासवडचा आठवडा बाजार रद्द केला आहे.सासवड येथे सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी येतात. तसेच संत सोपानदेव व चांगा वटेश्वर पालखी सोहळा सासवडच्या बाजारपेठेतून मार्गस्थ होतो. त्यामुळे रहदारीस अडथळा होऊ नये व वारकर्यांची सुरक्षा राहावी, या दृष्टीने आठवडे बाजार रद्द करण्याचा प्रस्ताव नगर परिषदेने पाठविला होता. त्यास जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी दिली. पालखी सोहळ्यानिमित्त बाजार बंद असल्याने शेतकरी व व्यापारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी केले आहे. चौकटसासवड शहरास रोज पाणीपुरवठा सुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. १२) सासवड येथे येत आहे. त्यानिमित्ताने सासवड नगर परिषदेने शहरास दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप व उपनगराध्यक्ष सुहास लांडगे यांनी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारपासून (दि. १०) सुरू झाल्याचे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.