शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

Sarkari Naukri : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळविण्याची संधी, 22 फेब्रुवारीच्या आधी करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 2:04 PM

बीएचईएलने काढलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 300 पदांसाठी भरती होईल. यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. (Golden Opportunity To Get Government Job Without Exam)

नवी दिल्ली -नोकरीसाठी सध्या सर्वच क्षेत्रांत जबरदस्त कॉम्पीटीशन सुरू आहे. अशा परिस्थितीत परीक्षा न देता सरकारीनोकरी मिळवणं, म्हणजे एक स्वप्नच झालं आहे. मात्र, यातच आता भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने (BHEL) एक सुंदर संधी उपलब्ध करून दिली आहे. BHELने ट्रेड अॅप्रेन्टिस शिवाय, वेगवेगळ्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी योग्य उमेदवारांची सरळ भरती होणार आहे.  या सरकारी नोकरीसाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा असणार नाही. (Sarkari naukri in BHEL)

बीएचईएलने काढलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण 300 पदांसाठी भरती होईल. यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 22 फेब्रुवारी, 2021पर्यंत असेल. यासंदर्भात आपण नोटिफिकेशन पाहू शकता.

कसा कराल अर्ज? -बीएचईएल ट्रेड अॅप्रेंटिस पदावर अर्ज करण्यासाठी आपल्याला एनएपीएस पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. येथे नोंदणी झाल्यानंतर आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. या रजिस्ट्रेशन नंबरच्या सहाय्याने आपण बीएचईएल भोपाळच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकता. 

अर्ज करण्यासाठी पात्रता -कुठल्याही मान्यता प्राप्त बोर्डातून 10वीची  परीक्षा पास केलेली असावी. संबंधित ट्रेडमधून आयटीआय डिप्लोमा कोर्स झालेला असावा. उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष असावे. तसेच आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल. 

या पदांसाठी मागविण्यात आले आहेत अर्ज -या भरती प्रक्रियेत, इलेक्ट्रिशनची 80 पदे, फिटरची 80 पदे, वेल्डरची 20 पदे, टर्नरची 20 पदे, मशीनिस्टची 30 पदे, ड्राफ्ट्समॅन (मॅकॅनिक)ची 5 पदे, इलेक्ट्रॉनिक्स (मॅकॅनिक)ची 5 पदे, COPA/PASAA ची 30 पदे, कारपेंटरची 5 पदे, प्लम्बरची 5 पदे, मॅकॅनिक मोटर वाहनची 5 पदे, मशीनिस्ट (ग्राईंडर)ची 5 पदे, ब्रिकलेयर (एमईएस)ची 5, तर पेंटरची 5 पदे, अशा एकूण 300 पदांसाठी भरती होईल.

टॅग्स :government jobs updateसरकारी नोकरीjobनोकरीGovernmentसरकार