Sanjay Singh : "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता गुन्हा केलाय की अटक करण्यात आली?, भाजपा उत्तर देईल का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 11:15 IST2024-07-01T11:06:25+5:302024-07-01T11:15:11+5:30

Sanjay Singh And Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

Sanjay Singh questions to bjp on cm Arvind Kejriwal arrest delhi excise policy aap protest | Sanjay Singh : "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता गुन्हा केलाय की अटक करण्यात आली?, भाजपा उत्तर देईल का?"

Sanjay Singh : "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता गुन्हा केलाय की अटक करण्यात आली?, भाजपा उत्तर देईल का?"

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आज (सोमवार) संसद संकुलाच्या गेटवर इंडिया आघाडीच्या नेत्यांची निदर्शनं सुरू आहेत. याच दरम्यान, आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी असा कोणता गुन्हा केला आहे की त्यांना अटक करण्यात आली? याचं उत्तर भाजप देईल का?" असा सवाल विचारला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संजय सिंह म्हणाले की, "सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. अरविंद केजरीवाल यांचा असा काय गुन्हा आहे की त्यांना जेलमध्ये ठेवलं आहे?"

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक चुकीची असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच आम आदमी पार्टीसोबतच इंडिया आघाडीचे नेते निदर्शनं करत आहेत. केजरीवाल यांना दिल्ली मद्य प्रकरणात १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, प्रकरणाच्या तपासात त्यांचे नाव "मुख्य सूत्रधार" म्हणून समोर आले आहे. तपास अद्याप प्रगतिपथावर असल्याने, त्यांची पुढील कोठडीदरम्यान चौकशी होऊ शकते.

तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर केजरीवाल यांना सीबीआयने कोर्टात हजर केले होते, सीबीआयने केजरीवाल यांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती. केजरीवाल तपासात सहकार्य करत नसून, जाणीवपूर्वक टाळाटाळ करणारे उत्तरे देत होते, असे सीबीआयने कोर्टात म्हटले आहे. 

सीबीआयने आपल्या रिमांड याचिकेत भीती व्यक्त केली आहे की, केजरीवाल चौकशीदरम्यान त्यांच्यासमोर आलेले पुरावे आणि संभाव्य साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात, ज्यांची अद्याप तपासणी व्हायची आहे. केजरीवाल यांना सीबीआयने २६ जून रोजी तिहार तुरुंगातून अटक केली होती, जिथे ते अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होते.
 

Web Title: Sanjay Singh questions to bjp on cm Arvind Kejriwal arrest delhi excise policy aap protest