शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपा हा मोठा पक्ष नाही, कंगना राणौतचे विचार..."; संजय राऊतांनी लगावला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 15:30 IST

Kangana Ranaut Sanjay Raut, Lok Sabha Election 2024: भाजपाने जाहीर केलेल्या यादीत अभिनेत्री कंगना राणौतला हिमाचल प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Kangana Ranaut Sanjay Raut, Lok Sabha Election 2024: महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार असताना उद्धव ठाकरे, संजय राऊत, शिवसेना यांच्याविरोधात कंगना राणौत हिने टीका केली होती. परिणामी कंगना विरूद्ध उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यातील संघर्ष अनेक दिवस चालला. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे जेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले, तसेच मूळ शिवसेना शिंदे यांचीच असल्याचा निर्णय झाला, तेव्हादेखील कंगनाने उद्धव यांना डिवचले होते. त्यानंतर आता  लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत कंगना हिलादेखील उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावर आज शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

"कंगना राणौत यांना उमेदवारी का देण्यात आली हे मी सांगू शकत नाही. या देशात लोकशाही आहे आणि आम्ही लोकशाही मानतो. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. अभिनेत्री कंगना राणौत यांचे विचार भाजपाच्या विचारधारेशी मिळतेजुळते असतील तर त्या नक्कीच निवडणूक लढवू शकतात. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून त्या उभ्या राहत आहेत, तर कोणाला जिंकवायचे आणि कोणाला पराभूत करायचे ते लोकांना ठरवू दे," अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाच्या उमेदवारीबाबत भाष्य केले.

"भाजपा हा मोठा पक्ष नाही. हा पक्ष कधीच मोठा नव्हता. एखादा दरोडेखोर जसे चोऱ्या-माऱ्या करून आपली संपत्ती वाढवतो तसं भारतीय जनता पक्षाचं सुरु आहे. दुसऱ्याच्या तिजोरीवर दरोडा टाकून आपली संपत्ती वाढवायची याला मी धनिक मानत नाही. लहान पक्षातून लोकं फोडायची आणि विकत घ्यायची, यात काहीच कौशल्य नाही. जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा त्यांची पार्टी शिल्लक राहणार नाही", असा इशाराच राऊतांनी दिला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतKangana Ranautकंगना राणौतbollywoodबॉलिवूडBJPभाजपा