सानियाच्या नियुक्तीवरून भाजपात विसंवाद
By Admin | Updated: July 25, 2014 02:44 IST2014-07-25T02:44:20+5:302014-07-25T02:44:20+5:30
टेनिस स्टार सानिया मिङर हिला तेलंगणचे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर बनविण्यावरून नवे वादंग उठविणा:या भारतीय जनता पार्टीत या विषयावर एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सानियाच्या नियुक्तीवरून भाजपात विसंवाद
हैदराबाद : टेनिस स्टार सानिया मिङर हिला तेलंगणचे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर बनविण्यावरून नवे वादंग उठविणा:या भारतीय जनता पार्टीत या विषयावर एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
तेलंगणचे भाजपा नेते क़े लक्ष्मण यांनी ‘पाकिस्तानची सून’ सानियाला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनविलेच कसे, असा सवाल करीत या वादाला तोंड फोडले असले तरी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सारवासारव करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. खुद्द सानियाने या वादंगाचा तीव्र निषेध केला असून मी अखेरच्या श्वासार्पयत भारतीय राहीन, अशी प्रतिक्रिया नोंदवली आह़े
राज्याचे मुख्यमंत्री क़े चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी सानियाला तेलंगणचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नियुक्त केल़े गुरुवारी राज्य विधानसभेत या निर्णयाचे पडसाद उमटल़े भाजपा नेते क़े लक्ष्मण यांच्याप्रमाणोच राज्यातील काँग्रेसनेही या निर्णयाविरोधी सूर आवळला़
सानिया म्हणते, मी मरेर्पयत भारतीय राहीन
‘पाकिस्तानची सून’ संबोधल्याने खुद्द सानिया मिङर कमालीची नाराज झाली आह़े माङो कुटुंब शतकापासून हैदराबादेत राहत आहेत़ अशा स्थितीत मी स्थानिक नाही, असे म्हणणो निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया तिने नोंदवली़
सानिया तेलंगण व हैदराबादची ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर बनण्याच्या लायकीची नाही. सानियाची योग्यता वेगळ्या(टेनिस) क्षेत्रत आह़े ती हैदराबाद आणि तेलंगणची ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर कशी असू शकते?
-पोन्नाला लक्ष्मैय्या,
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
सानिया मिङर भारताचा गौरव- जावडेकर
4केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे गुरुवारी या वादावर पडदा टाकताना दिसल़े सानिया भारताचा गौरव आह़े तिची जागतिक कीर्ती बघता आम्हाला काहीही आक्षेप नाही़ ती भारताची ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर आहे, असे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर येथे पत्रकारांना म्हणाल़े