शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

मोदीजी देश के बाप है! असं म्हणणा-या भाजपा प्रवक्त्याला मिळालं 'कडक' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 17:58 IST

भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी न्यूज 18 इंडिया चॅनलच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना देश का बाप असं म्हटलं

मुंबई: भाजपा प्रवक्ता संबित पात्रा यांनी न्यूज 18 इंडिया चॅनलच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींना देश का बाप असं म्हटलं आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यासोबत झालेल्या एका डिबेट शोमध्ये बोलताना संबित पात्रा यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी नरेंद्र मोदी हे ‘देश के बाप है, सब के बाप है’ असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर कन्हैया कुमार चांगलाच संतापला, आणि ते तुमचे बाप असतील पण देशाचे बाप नाहीयेत, बोलताना शब्द जपून वापरा अशा शब्दांमध्ये त्यांना सुनावलं. आजपर्यंत मोदी-मोदी करूनच तुम्ही राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे. त्यामुळेच ओएनजीसीचे डायरेक्टर तुम्ही झाला आहात, आता काय मंत्री व्हायचंय का? अशा शब्दांमध्ये कन्हैयाने संबित पात्रांवर थेट हल्लाबोल केला. या कार्यक्रमात नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी ही दोन्ही नावं एकत्र छेडून कन्हैयाने संबित पात्रा यांची कोंडी केली होती. गोडसेला मानतात की गांधींना मानतात या प्रश्नावर कन्हैयाने संबित पात्रांची गोची केल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. संबित पात्रा यांनी मोदींना देश का बाप संबोधून राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान केल्याचं कॉंग्रेसने म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी संबित पात्रा यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. अजूनपर्यंत कोणीही राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अशाप्रकारे अपमान केलेला नाही. याच भाजपाने मध्य प्रदेशमध्ये नथुराम गोडसेचं मंदिर उभारलं आहे, गोडसे महापुरूष होते असं भाजपाच्या मंत्र्याने म्हटलं होतं, अशा शब्दांमध्ये भाजपावर टीका करत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींनी माफी मागावी आणि संबित पात्रांना पक्षातून निलंबित करावं अशी मागणी केली आहे. ज्या प्रकारे आम्ही मणिशंकर अय्यर यांना निलंबित केलं तसंच मोदी पात्रा यांना बाहेरचा रस्ता दाखवतील का ? मोदींनी असं पाऊल उचलल्यास कॉंग्रेस त्याचं स्वागत करेल असं सुरजेवाला यावेळी म्हणाले.   

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारSambit Patraसंबित पात्राNarendra Modiनरेंद्र मोदी