सायना सुधारीत
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
सायनाने रचला इतिहास
सायना सुधारीत
सायनाने रचला इतिहास चीनच्या सून यूवर मात : ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या फायनलमध्ये केला प्रवेशबर्मिंघम : भारताची अनुभवी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत आपला विजयी धडाका कायम राखताना एकेरीच्या फायनलमध्ये प्रवेश केला़ विशेष म्हणजे स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणारी सायना पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे़एकतर्फी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत सायनाने गैर मानांकित चीनच्या सून यू हिचा २१-१३, २१-१३ अशा फरकाने पराभव करताना थाटात अंतिम फेरीत आपली जागा पक्की केली़ या लढतीत चीनच्या सून यूचा जागतिक मानांकनात तिसर्या स्थानावर असलेल्या सायनासमोर निभाव लागला नाही़ त्यामुळे स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे तिचे स्वप्न धुळीस मिळाले़यापूर्वी सायनाने २०१० आणि २०१३ मध्ये स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता; मात्र तिला विजय मिळविता आला नव्हता़ त्याआधी भारताचे माजी दिग्गज माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी १९८० मध्ये, तर पी़ गोपीचंद याने २००१ मध्ये स्पर्धेचे अजिंक्यपद आपल्या नावे केले होते़ आता या स्पर्धेचे जेतेपद मिळवून सायनाला नवा विक्रम नावे करण्याची संधी आहे़ सायनाला फायनलमध्ये आता चिनी तैपेईच्या ताई जू यिंग आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यातील विजेत्याशी झुंज द्यावी लागणार आहे़पहिल्या गेममध्ये सायना ०-२ ने पिछाडीवर होती; मात्र यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूने आपली आघाडी ६-२ अशी केली;मात्र यानंतर सायनाने जोरदार मुसंडी मारताना स्कोअर ८-१० असा केला़ पुन्हा सून हिने ११-१० अशी आघाडी घेतली; मात्र ब्रेकनंतर सायनाने आपल्या रणनीतीत बदल करताना १६-१२ अशी आणि त्यानंतर हीच आघाडी १९-१३ अशी करीत गेम आपल्या नावे केला़दुसर्या गेममध्ये सून हिने सुरुवातीलाच आघाडी घेतली; मात्र सायनाने जोरदार स्मॅश लगावताना ब्रेकपर्यंत ११-९ अशी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली़ यानंतर सून हिने आपला खेळ सुधारताना स्कोअर १२-१२ असा केला़ भारताच्या सायनाने वेळीच आपला खेळ उंचावताना सामन्यात आघाडी घेत गेमसह सामन्यात बाजी मारत फायनल गाठली़त्याआधी सायनाने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या यिहान वँग हिच्यावर अवघ्या ३९ मिनिटांत २१-१९, २१-६ अशा फरकाने विजय मिळवीत थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता़