Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:03 IST2025-04-23T11:58:29+5:302025-04-23T12:03:44+5:30

Pahalgam Terror Attack News : भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधाराची ओळख निश्चित केली आहे. त्याच्यासोबत आणखी दोन लोकांनी मिळून हा कट रचल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Saifullah Kasuri alias Khalid a top LeT commander is the mastermind of the pahalgam terror attack | Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश

Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश

Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने सगळा देश हादरला आहे. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा पुरस्कृत द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेच्या दहशतावाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्याचा तपास आता सुरू करण्यात आला असून, हल्ल्यातील मास्टरमाईंडबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांच्या तपासानुसार द रेझिस्टन्स फ्रंटचा म्होरक्याने पूर्वनियोजितपणे हा हा हल्ला केला आहे. यात पाकव्याप्त काश्मिरातील दोन अतिरेक्यांचाही समावेश आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

द रेझिस्टन्स फ्रंटच्या कमांडर सैफुल्लाह कसुरी ऊर्फ खालीद हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्यांने पाकव्याप्त काश्मिरातील दोन दहशतवाद्यांच्या मदतीने या हल्ल्याचा कट रचला.  

वाचा >>"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप

सात दिवस केली रेकी, नंतर केला हल्ला

या हल्ल्याबद्दल आता हळूहळू माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी पहलगाममधील बैसरन घाटीची पाहणी केली. सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. एक एप्रिल ते सहा एप्रिल दरम्यान दहशतवाद्यांनी या परिसराची पाहणी केली. 

सुरक्षा जवानांना सापडली मोटारसायकल

सुरक्षा जवानांना घटनास्थळापासून काही अंतरावर एक मोटारसायकल सापडली आहे. जिला नंबरप्लेट नाही. ही गाडी दहशतवाद्यांकडून वापरली गेली असावी, असा संशय आहे. सैफुल्लाह याने संपूर्ण हल्ल्याचा कट रचला आणि त्यानंतर सहा दहशतवाद्यांनी अचानक पर्यटकांना घेरत हल्ला केला. 

या घटनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण जखमी झाले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काश्मीरला पोहोचले. त्यांनी ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला, त्या ठिकाणाला भेट दिली. मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांचेही शाह यांनी सांत्वने केले. 

Web Title: Saifullah Kasuri alias Khalid a top LeT commander is the mastermind of the pahalgam terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.