अमित शहांनी ठिकाण-वेळ ठरवावी, मी चर्चेला तयार : केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 16:42 IST2020-02-05T16:42:04+5:302020-02-05T16:42:15+5:30

शहा म्हणतील त्या विषयावर मी चर्चा करायला तयार असल्याचे सुद्धा केजरीवाल म्हणाले.

said Arvind Kejriwal Amit Shah should decide time and place ready for discussion | अमित शहांनी ठिकाण-वेळ ठरवावी, मी चर्चेला तयार : केजरीवाल

अमित शहांनी ठिकाण-वेळ ठरवावी, मी चर्चेला तयार : केजरीवाल

नवी दिल्ली :दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला असताना राजकीय वातवरण तापताना दिसत आहे. विशेष करून भाजप आणि आम आदमी पार्टीच्या नेते एकेमकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. गृहमंत्री अमित शहांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. त्यांचे हे आव्हान केजरीवाल यांनी स्वीकारले आहे.

केजरीवाल यांनी भाजपवर टीका करताना, भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले होते की, आमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे असे विचारणाऱ्या केजरीवाल यांच्यासोबत मला विकासाच्या मुद्यावर चर्चा करायची आहे.

यावर उत्तर देताना केजरीवाल म्हणाले की, शहा यांनी ठिकाण आणि वेळ ठरवावी मी त्यांच्या सोबत प्रत्येक मुद्यावर चर्चा करायला तयार आहे. या चर्चेत दिल्लीतील प्रत्येक प्रश्नावर आपण बोलू, तसेच शहा म्हणतील त्या विषयावर मी चर्चा करायला तयार असल्याचे सुद्धा केजरीवाल म्हणाले.

 

 

 

Web Title: said Arvind Kejriwal Amit Shah should decide time and place ready for discussion