Video - अरेरे! गोव्याला हनिमूनला जायचं होतं पण 'तो' पोहोचला जेलमध्ये; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 14:58 IST2024-01-16T14:51:12+5:302024-01-16T14:58:28+5:30

साहिल कटारिया याचं 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालं असून तो हनिमूनसाठी पत्नीसोबत गोव्याला जात होता.

sahil kataria accused who slapped pilot was going to goa for honeymoon delhi airport indigo flight | Video - अरेरे! गोव्याला हनिमूनला जायचं होतं पण 'तो' पोहोचला जेलमध्ये; नेमकं काय घडलं?

फोटो - आजतक

इंडिगो फ्लाईटमध्ये पायलटला धक्काबुक्की करणारा आरोपी साहिल कटारियाबद्दल आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रविवारी साहिल पत्नीसोबत विमानात बसून हनिमूनसाठी गोव्याला जात होता. पण विमान रद्द झाल्याच्या घटनेमुळे तो संतापला आणि रागाच्या भरात त्याने पायलटवरच हल्ला केला.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलची चौकशी करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, साहिल कटारिया याचं 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालं असून तो हनिमूनसाठी पत्नीसोबत गोव्याला जात होता. साहिलने पोलिसांना सांगितले की, विमानाला उशीर होत असल्याच्या अनाउन्समेंट सातत्याने केल्या जात होत्या, त्यामुळे तो संतापला.

रविवारी खराब हवामानामुळे अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या विमानाला उशीर झाल्याची अनाउन्समेंट पायलट करत असताना साहिल कटारिया नावाच्या प्रवाशाने त्याच्यावर हल्ला केला. साहिलने पायलटला धक्काबुक्की केली होती. 

घटनेनंतर सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि साहिलला ताब्यात घेतलं. या घटनेनंतर साहिलच्या पत्नीलाही फ्लाइटमधून काढण्यात आले. दिल्ली पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कटारियाला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: sahil kataria accused who slapped pilot was going to goa for honeymoon delhi airport indigo flight