मध्य प्रदेशमधील गुना येथे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर एका साधूने त्रिशूळाद्वारे हल्ला केल्याची घटना घडली आहे. गुनामधील मधुसुदनगड येथे घडलेल्या या घटनेत एक पोलीस अधिकारी जखमी झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी स्थानिक प्रशासन फौजफाटा घेऊन अतिक्रमण हटवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी संतापलेल्या साधूने हा हल्ला केला. तर यादरम्यान, एका महिलेने अतिक्रमणविरोधी कारवाईला विरोध करताना विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला.
गुना येथील मक्सुदनगड येथे बस स्टँड नसल्याने लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल होता. माजी जिल्ह्याधिकाऱ्यांना भोपाळ रोडवर बस स्टँडसाठी जागा आरक्षित केली होती. मात्र ज्या जागेवर बस स्टँड बांधणं नियोजित होतं. तिथे अतिक्रमण करणाऱ्यांनी कब्जा केलेला होता. अतिक्रमण हटवण्यासाठी भाजपा नेते रुद्रदेव सिंह यांनी यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना विनंती केली होती.
अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाचे अधिकारी शनिवारी जेव्हा या ठिकाणी पोहोचले तेव्हा एक साधून विरोध करण्यासाठी पुढे आला. त्याने जामनेर पोलीस ठाण्यातील अधिकारी सुरेश कुशवाहा यांच्यावर त्रिशुळाने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ला करणाऱ्या साधूला अटक करण्यात आली आहे.