शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
4
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
5
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
6
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
7
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
8
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
9
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
10
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
11
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
12
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
13
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
14
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
15
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
17
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
18
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
19
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
20
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

राजस्थान संकट : दिग्विजय सिंहांचा सचिन पायलटांना सल्ला, म्हणाले - 'जोतिरादित्य शिंदेंसारखं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 19:26 IST

काँग्रेसने पायलटांना उपमुख्यमंत्री पदाबरोबरच राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काढले आहे. पायलटांसोबत आणखी 18 आमदारांनी बंडखोरी केली आहे.

ठळक मुद्देदेशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला सोडू नका, दिग्विजय सिंहांचा पायलटांना सल्लादिग्विजय सिंह म्हणाले, 'मी पायलटांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत.दिग्विजय सिंह म्हणाले, महत्वाकांक्षा असणे चांगली गोष्ट, पण...

भोपाळ - राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय संकटासाठी भाजपाला जबाबदार धरत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सचिन पायलटांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला सोडू नका. आपल्यासाठी काँग्रेसमध्ये उज्जवल भविष्य आहे. यामुळे त्यांनी पक्ष सोडून भाजपात गेलेले माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंसारखं अनुकरण करू नये.

काँग्रेसने पायलटांना उपमुख्यमंत्री पदाबरोबरच राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काढले आहे. पायलटांसोबत आणखी 18 आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या खुर्चीवर तलवार लटली आहे. भाजपा राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. असे असतानाच दिग्विजय सिंहानी पायलटांना सल्ला दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनीही. राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय संकटामागे भाजपाचा हात असल्याचे म्हटले आहे. ते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दिग्विजय सिंह म्हणाले, 'मी पायलटांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र, मी केलेल्या कॉलला आणि पाठवलेल्या मेसेजसला ते कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत.' तसेच, "अशोक गेहलोत यांच्याकडून आपण दुखावले गेले असलात तरीही, असे सर्व मुद्दे शांततेने सोडविले जातात. शिंदेंनी जी चूक केली, ती आपण करू नये. भाजपा अविश्वसनीय आहे. एखाद्या दुसऱ्या पक्षातून भाजपात गेलेल्या कुठल्याही व्यक्तीला तेथे यशस्वी होता आलेले नाही,' असे दिग्विजय सिंह म्हणाले. 

महत्वाकांक्षा असणे चांगली गोष्ट, पण... -"ही पहिलीच वेळ आहे, की पायलटांनी मला उत्तर दिले नाही. सचिन माझ्या मुलासारखा आहे. ते माझा सन्मान करतात आणि मलाही ते आवडतात. मी त्यांना तीन-चार वेळा फोन केला आणि मेसेजही केले. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. ते आधी तत्काळ उत्तर देत होते. महत्वाकांक्षा असणे चांगली गोष्ट आहे. महत्वाकांक्षेशिवाय कुणीही पुढे जाऊ शकत नाही. मात्र, महत्वकांक्षेबरोबरच प्रत्येकानेच आपली संघटना, विचारधारा आणि राष्ट्राप्रती एकनिष्ठ असायला हवे,' असेही दिग्विजय सिंह म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या -

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट

चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट 

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहRajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस