शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Pilot Protest : वरिष्ठांच्या इशाऱ्यानंतरही सचिन पायलट उपोषणाला बसले; बॅनरवर राहुल-सोनिया यांचे फोटो नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 14:09 IST

Ashok Gehlot vs Sachin Pilot: राजस्थान विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना पुन्हा पायलट vs गेहलोत सामना पाहायला मिळत आहे.

जयपूर : या वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पण, त्यापूर्वीच राज्यातील राजकारण तापले आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन आपल्याच सरकारविरोधात उपोषणाला बसले आहेत. पायलट यांच्या उपोषणाला पक्षश्रेष्ठींकडून विरोध होता. काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंग रंधावा यांनी या उपोषणाला पक्षविरोधी कृत्यही म्हटले, तरीदेखील पायलट उपोषणाला बसले. त्यांच्याविरोधात पक्ष काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

बॅनरवरुन काँग्रेस नेत्यांचे फोटो गायबपायलट सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे उपोषण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी मोठ्या संख्येने पायलट समर्थक हुतात्मा स्मारकावर जमले आहेत. विशेष म्हणजे, परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर राहुल गांधी आणि सोनिया यांच्यासोबत काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याचे फोटो नाहीत. पायलट यांच्या उपोषणासाठी हुतात्मा स्मारकावर स्टेज उभारण्यात आला असून, तिथे फक्त महात्मा गांधींचा फोटो लावण्यात आला आहे.

राज्यभरातून समर्थक आलेविशेष म्हणजे रविवारीच पायलट यांनी आपल्या समर्थकांसह मंगळवारी आपल्याच सरकारच्या विरोधात उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती. पायलट यांच्या उपोषणात सामील होण्यासाठी राज्यभरातून त्यांचे समर्थक जयपूरमधील हुतात्मा स्मारकावर पोहोचले आहेत. यावेळी मंचावर पायलटभोवती काही माजी आमदार आणि तरुण चेहरेही दिसत आहेत. दुपारी उपोषण संपल्यानंतर पायलट आपली पुढील रणनीती स्पष्ट करतील. आज पायलट काही मोठी घोषणा करू शकतात, अशी माहिती आहे. 

उपोषण कशासाठी? रविवारी जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सचिन पायलट यांनी सीएम अशोक गेहलोत यांच्यावर मागील वसुंधरा राजे सरकारच्या काळात उघड झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप केला. पायलट म्हणाले की, केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या एजन्सीचा गैरवापर करत आहे आणि आमच्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई केली जात आहे, परंतु राजस्थानमध्ये आमचे सरकार एजन्सीचा कोणताही वापर करत नाही. राजस्थानमध्ये 2018 च्या निवडणुकीपूर्वी भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली होती, परंतु आमचे सरकार सत्तेत आल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. यावरुन लोक वसुंधरा राजे आणि गेहलोत यांच्यात काही मिलीभगत असल्याचे म्हणू शकतात, असे पालयट म्हणाले. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपा