शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

एस. पी. यादव नवीन आयुक्त

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

पाठक पुण्याचे आयुक्त : अनुपकुमार मुंबईला सहआयुक्त

पाठक पुण्याचे आयुक्त : अनुपकुमार मुंबईला सहआयुक्त
नागपूर : अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि सीआयडीचे प्रमुख एस. पी. यादव यांची नागपुरच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. लोकमतने रविवारच्या अंकात नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून एस. पी. यादव होणार असल्याच्या आशयाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते.
यादव गेल्या दोन वर्षांपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. येथील पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे त्यांची बदली होणार, अशी महिनाभरापासूनच चर्चा होती. मुख्यमंत्र्यांच्या गुड बुकमध्ये असल्यामुळे पाठक यांना नवी मुंबई, पुणे किंवा ठाण्याचे आयुक्त म्हणून नियुक्त केले जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. लोकमतने तसे वृत्तही प्रकाशित केले होते. ते अखेर खरे ठरले. मुंबई आयुक्तानंतर राज्यातील सर्वात महत्त्वाचे पद मानल्या जाणाऱ्या पुणे पोलीस आयुक्त पदावर पाठक यांना नियुक्त करण्यात आले. तर रश्मी शुक्ला, बिपीन बिहारी, कनकरत्नम, विवेक फणसाळकर तसेच डॉ. भूषणकुमार उपाध्याय ही नावे बाजूला सारत नागपूरचे आयुक्त म्हणून एस. पी. यादव यांची नियुक्ती झाली.
आयुक्तांसोबतच सहआयुक्त अनुपकुमार सिंह यांची मुंबईला सहआयुक्त (आर्थिक शाखा) म्हणून बदली करण्यात आली. सर्वाधिक कार्यकाळ आणि विविध पदे सांभाळणारे अधिकारी म्हणून अनुपकुमार यांचे नाव घेतले जाते. उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहपोलीस आयुक्तांसोबतच एएनओचे विशेष महानिरीक्षक म्हणून अनुपकुमार यांनी नागपुरात तब्बल सात वर्षे सेवा दिली आहे. सहआयुक्त म्हणून आता राजवर्धन जबाबदारी सांभाळणार आहेत. ते १९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. विदर्भात यापूर्वी त्यांनी नक्षलग्रस्त गोंदियात सेवा दिली आहे.
अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे यांचीही मुंबईलाच राज्य मानवाधिकार आयोगाचे उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. हे पद यापूर्वी महानिरीक्षक दजाचे होते. मात्र, तेथे जाण्यास ते फारसे उत्सुक नव्हते. पांडे यांच्या बदलीसोबत हे पद उपमहानिरीक्षक दर्जाचे करण्यात आले.
पांडे येथे दीड वर्षांपासून कार्यरत होते. मितभाषी आणि सौजन्यशील अधिकारी असा पांडे यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या कक्षाचे दार सतत उघडेच होते. कसलीही औपचारिकता पार न पाडता त्यांना कुणीही सहज भेटू शकत होते.
---
जोड आहे...
पाठक म्हणतात...