RSS Song Row:कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रार्थना गीत गायल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. फक्त काँग्रेसच नाही, तर भाजप नेतेही त्यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान, प्रकरण वाढल्यानंतर आता शिवकुमार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आणि माफीही मागितली आहे. 'कोणाचे मन दुखावले असेल, तर माफी मागतो', असे डीके शिवकुमार म्हणाले.
पाहा व्हिडिओ
उपमुख्यमंत्र्यांनी मागितली माफी
डीके शिवकुमार म्हणाले की, मी फक्त टिप्पणी केली आणि त्यांचा (भाजपचा) पाय ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझे काही मित्र जनतेमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या. जर कोणाचे मन दुखावले असेल, तर मी सर्वांची माफी मागतो. गांधी कुटुंबावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. मी जन्मतः काँग्रेसी आहे आणि काँग्रेसमध्येच मरेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत गायले आरएसएस गाणे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी अलीकडेच विधानसभेत आरएसएस प्रार्थना गीत गायले. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर विधानसभेत चर्चा सुरू होती, त्यादरम्यान त्यांनी अचानक गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यामुळे तेथे उपस्थित असलेले सर्वांना धक्का बसला. विशेषतः काँग्रेस आमदारांनाही आश्चर्य वाटले.
डीके शिवकुमार यांच्याव्यतिरिक्त, सत्ताधारी काँग्रेस आमदार एचडी रंगनाथ यांनीही रविवारी आरएसएसच्या प्रार्थनेच्या काही ओळी गायल्या. त्यांनी केवळ काही ओळीच गायल्या नाहीत, तर कौतुकही केले. त्यानंतर कर्नाटकच्या राजकारणात एक नवीन वाद सुरू झाला आहे.