rss schools fired teacher because did not give donation to ram mandir construction | राम मंदिराला देणगी न दिल्याने नोकरीवरून काढले? RSS संचालित शाळेतील प्रकार

राम मंदिराला देणगी न दिल्याने नोकरीवरून काढले? RSS संचालित शाळेतील प्रकार

ठळक मुद्देराम मंदिरासाठी देणगी न दिल्याने शाळेतून काढलेRSS संचालित शाळेतील धक्कादायक प्रकारशाळा प्रशासनाकडून आरोपांचे खंडन

बल्लिया : अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir) उभारणीसाठी देशभरातून देणगी गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आलेली ही मोहीम अलीकडेच थांबवण्यात आली आहे. या मोहिमेतून सुमारे अडीच हजार कोटी रुपये देशभरातील नागरिकांनी राम मंदिरासाठी देणगी म्हणून दिले आहेत. मात्र, उत्तर प्रदेशातील बल्लिया येथे राम मंदिराला देणगी (Ram Mandir Donation) न दिल्याने नोकरीवरून काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (rss schools fired teacher because did not give donation to ram mandir construction)

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील राम मंदिराला एक हजार रुपयांची देणगी न दिल्याने बल्लिया येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) संचालित शाळेतून नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचा आरोप एका शिक्षकाने केला आहे. मात्र, शाळा प्रशासनाने या आरोपाचे खंडन केले आहे. 

राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद; केवळ 'या' ठिकाणी देता येईल दान

आठ महिन्यांचा पगारही दिला नाही!

यशवंत प्रताप सिंह असे या शिक्षकाचे नाव असून, ते जगदीशपूर परिसरातील सरस्वती शिशू मंदिर या शाळेत कार्यरत होते. शाळेने आपला आठ महिन्यांचा पगारसुद्धा रोखला असल्याचा दावा यशवंत प्रताप सिंह यांनी केला आहे. सिंह यांच्याकडे राम मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी पावती पुस्तक देण्यात आले होते. त्याद्वारे त्यांनी ८० हजार रुपये गोळा करून जमा केले. मात्र, RSS चे जिल्हा प्रचारक सत्येंद्र सिंह यांनी यशवंत प्रताप सिंह यांना एक हजार रुपये देणगी देण्याची सक्ती केली. देणगी देण्यास नकार दिल्याने शाळा प्रशासनाने नोकरीवरून काढून टाकले, असा आरोप या शिक्षकाकडून करण्यात आहे. 

प्रशासनाकडून आरोपांचे खंडन

शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार देणगी गोळा करण्यासाठी पावतीपुस्तके देण्यात आली होती. सिंह यांनी स्वेच्छेने तीन पावतीपुस्तके घेतली. मात्र, पावती पुस्तके परत केली नाहीत. आणि राजीनामा दिला, असे प्राचार्य धिरेंद्र यांनी या आरोपांचे खंडन करताना सांगितले. सिंह यांना शाळेत शिकवण्यात कोणतेही स्वारस्य नव्हते. तसेच ते बेजबाबदार होते. राम मंदिरासाठी देणगी देण्यासाठी कुणावरही सक्ती करण्यात आलेली नव्हती, अशी प्रतिक्रिया जिल्हा प्रचारक सत्येंद्र सिंह यांनी या प्रकरणी दिली आहे. 

दरम्यान, या एकूणच प्रकरणाबाबत दंडाधिकारी कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचे शिक्षक यशवंत प्रताप सिंह यांनी सांगितले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rss schools fired teacher because did not give donation to ram mandir construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.