शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

'संजू'विरोधात संघाने शंख फुंकला; बॉलिवूडमधील 'माफिया राज'वर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 6:37 PM

बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' अभिनेता संजय दत्त याच्या जीवनपटावरून - 'संजू' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतली आहे.

नवी दिल्लीः बॉलिवूडचा 'मुन्नाभाई' अभिनेता संजय दत्त याच्या जीवनपटावरून - 'संजू' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेतली आहे. हा चित्रपट म्हणजे एका गुन्हेगाराचं उदात्तीकरण आहे, एक खलनायक सिनेमाचा नायक कसा होऊ शकतो?, अशी टीका 'पांचजन्य' या संघाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे. 

'किरदार दागदार' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात, 'संजू'च्या निर्मात्यांच्या हेतूवर शंका उपस्थित करण्यात आलीय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त दोषी ठरला होता. पण या भूतकाळावर पडदा टाकून फक्त त्याच्या मेकओव्हरची गोष्ट सिनेमात दाखवण्यात आलीय. संजय दत्तने किती संघर्ष करून परिस्थितीवर मात केली, यावर दिग्दर्शकाचा प्रकाशझोत आहे. त्यातून समाजात चुकीचा संदेश जात असल्याची टिप्पणी 'पांचजन्य'ने केली आहे. 

बॉलिवूड, सिनेसृष्टी माफियांच्या जाळ्यात अडकली आहे. त्यामुळेच देशाचे गुन्हेगार असलेल्या खलनायकांचं उदात्तीकरण केलं जातंय. 'संजू' किंवा 'रईस' यासारखे सिनेमे काढून नेमका काय आदर्श पुढच्या पिढीपुढे ठेवायचा आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान, 'संजू' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच त्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर 'संजू'चे चाहते आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमकी उडत आहेत. दुसरीकडे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सगळ्या सिनेमांना मागे टाकत जवळपास ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

टॅग्स :Sanju Movie 2018संजू चित्रपट 2018RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघSanjay Duttसंजय दत्तbollywoodबॉलिवूड