सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 23:41 IST2021-04-09T23:38:33+5:302021-04-09T23:41:23+5:30
rss chief Mohan Bhagwat tests corona positive: मोहन भागवत यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह; प्रकृती स्थिर

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरू
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शुक्रवारी त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे लगेच त्यांची चाचणी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले असल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली आहे.