शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

शाहांच्या उपस्थितीत भाजपा-संघाची बैठक; राम मंदिरावर चर्चा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 07:52 IST

बैठकीला भाजपा, संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपाचे पदाधिकारीदेखील उपस्थित होते. दिल्ली काबीज करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उत्तर प्रदेशात नेमकी काय रणनिती असावी, यावर या बैठकीत खल झाला. मात्र यामध्ये राम मंदिराच्या मुद्यावर चर्चा झाली नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या मुद्यावर विशेष भर दिला होता. मात्र अमित शहांसमोर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राम मंदिराचा विषय उपस्थित केला नाही. लखनऊमधील आनंदी वॉटर पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अमित शहांसह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संघ आणि भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी योगी सरकारच्या कामाचं कौतुक केल्याची माहिती भाजपाच्या नेत्यानं दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनिती काय असावी, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचवल्या जाव्यात, याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. संघ आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमधील या बैठकीनंतर संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ही नियमित बैठक होती. भविष्यातील योजना काय असाव्यात, याची चर्चा या बैठकीत झाली, अशी माहिती गोपाल यांनी दिली. या बैठकीत राम मंदिराबद्दल चर्चा झाली का, असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला. यावर गोपाल यांनी नाही, असं उत्तर दिलं. ही बैठक राजकीय स्वरुपाची नव्हती, असंदेखील ते म्हणाले.  

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शाहBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघUttar Pradeshउत्तर प्रदेशLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९