'रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देणार'; फैजान अन्सारी काय बोलला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 15:12 IST2025-02-12T15:08:29+5:302025-02-12T15:12:39+5:30
Ranveer Allahbadia: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. आता तर रणवीरची जीभ कापणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा एका इन्फ्लुएन्सरने केली आहे.

'रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देणार'; फैजान अन्सारी काय बोलला?
Ranveer Allahbadia Latest News: आईवडिलांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या युट्यूबर रणवीर अलाहाबादियावर सडकून टीका होत आहे. त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्याचे फॉलोअर्स कमी होत आहे. त्यात आता एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने चक्का रणवीरची जीभ कापण्याची भाषा केली आहे. जो कोणी रणवीरची जीभ कापून आणेल, त्याला पाच लाख रुपये देणार असेल इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारीने म्हटले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
समर रैनाच्या इंडियाज गॉट लेटंट शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने केलेल्या एका वादग्रस्त विधानाने संतापाची लाट उसळली. रणवीर अलाहाबादियासह, समय रैना आणि आतापर्यंत शोमध्ये सहभागी झालेल्या ४० सेलिब्रिटी युट्यूबर्स विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रणवीर अलाबादियाची जीभ कापणाऱ्याला पाच लाख
रणवीर अलाबादिया, अपूर्वा मखीजा, समय रैना यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. याच दरम्यान, इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी याने एक व्हिडीओ पोस्ट केला असून, त्यात मी त्या शोला असतो, तर रणवीरची तिथेच जीभ कापली असती असे म्हटले आहे.
"युट्यूबर रणवीर अलाबादियाने जे काही केलं आहे, ते किळसवाणे आहे. जर मी तिथे असतो, तर त्याची जीभ कापली असती. मला खूप लाज वाटत आहे. देशातील कोणीही, जो रणवीर अलाहाबादियाची जीभ कापेल, त्याला मी पाच लाख रुपयांचे बक्षीस देईन", असे अन्सारीने म्हटले आहे.
सैफला रुग्णालयात सोडणाऱ्या रिक्षाचालकाला दिले होते ११ हजार
अन्सारी हा इन्फ्लुएन्सर असून, तो बॉलिवूडमधील कलाकारांसोबत दिसतो. यापूर्वी तो एका रिक्षाचालकाला ११ हजार रुपये दिल्यामुळे चर्चेत आला होता. चोराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या अभिनेता सैफ अली खानला ज्या रिक्षाचालकाने रुग्णालयात नेले होते, त्याला अन्सारीने ११ हजार रुपये दिले होते.
मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
वादग्रस्त विधाना प्रकरणी मुंबई पोलिसांनी रणवीर अलाबादिया, अपूर्वी मखीजा, समय रैनासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे, अशी माहिती झोन ९ चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सांगितले आहे.