अयोध्या - बरेलीत शहर दंडाधिकारी यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशात आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने राजीनामा सोपवल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अयोध्येत तैनात जीएसटी विभागाचे उपायुक्त प्रशांत कुमार सिंह यांनी त्यांच्या पदाचा त्याग केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समर्थनार्थ त्यांनी हा निर्णय घेतला. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर अधिकाऱ्याने पत्नीला फोन लावला आणि तिच्यासमोर अधिकाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. फोनवर ढसाढसा रडत त्यांनी हॅलो, मी राजीनामा दिलाय..आता आणखी सहन होत नाही असा संवाद साधला.
प्रशांक कुमार सिंह यांनी पत्नीशी संवाद साधताना म्हटलं की, मी २ रात्रीपासून नीट झोपलो नाही. मन खूप व्यथित आहे. ज्याचे मीठ खातोय, त्याचे उपकार फेडायला हवेत. मी ज्या राज्यासाठी काम करतोय, ज्या सरकारच्या नेतृत्वात काम करतोय. जर त्या नेतृत्वाविरोधात अपमानजनक विधाने होत असतील आणि मी गप्प राहावे हे मला शक्य नव्हते असं त्यांनी सांगितले. मला २ मुली आहेत, त्यांना हे कळायला हवे की त्यांचा बाप योग्य आणि अयोग्य यामध्ये उभा राहताना घाबरला नाही. हा निर्णय घाईने घेतला नाही. बराच विचार करून मी राजीनाम्याचा निर्णय घेतला असं त्यांनी म्हटलं.
राज्यपालांना पाठवले २ पानी राजीनामा पत्र
प्रशांत कुमार सिंह यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांना राजीनामा पाठवला. या २ पानी पत्रात त्यांनी ज्योतिष्पीठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात केलेल्या टीकेवर नाराजी व्यक्त केली. अशाप्रकारच्या टीका केवळ एका व्यक्तीविरोधात नाही तर संपूर्ण देशातील लोकशाहीचा ढाचा, संविधान आणि जनादेशावर थेट हल्ला आहे असं त्यांनी सांगितले. एक सरकारी अधिकारी असल्याने माझा एक राजकीय धर्म आहे. हा धर्म केवळ फाईलांचा निपटारा करणे आणि महसूल जमा करणे इतका मर्यादित नाही. तर त्याच व्यवस्था, नेतृत्वाचा सन्मानाचे रक्षण करायला हवे ज्यात मी काम करतोय. लोकशाही पद्धतीने निवडलेले पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याविरोधात सार्वजनिक व्यासपीठावरून अभद्र भाषेचा वापर करणे अस्थिरता निर्माण केल्यासारखे आहे. त्यावेळी मी गप्प बसणे हे माझ्या मनाला पटले नाही असं सांगितले.
दरम्यान, राजीनामा पत्रात प्रशांत कुमार सिंह यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद समाजात द्वेष पसरवण्याचं काम करतायेत असा आरोप केला. अनेक वर्षाच्या संघर्षानंतर देश संविधानाच्या माध्यमातून समानता आणि न्याय मार्गावर चालला आहे. त्यावेळी कुठल्याही जबाबदार धार्मिक अथवा सामाजिक व्यक्तीकडून विभाजनकारी भाषेचा वापर दुर्दैवी आहे. जोपर्यंत माझा राजीनामा स्वीकारला जात नाही तोवर मी माझी जबाबदारी निष्ठेने पार पाडेन. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे लोकशाहीपद्धतीने निवडून आले आहेत. त्यांचा अपमान कुठल्याही प्रकारे सहन करू शकत नाही असंही अधिकारी प्रशांत कुमार सिंह यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.
Web Summary : Upset by criticism against CM Yogi, GST Deputy Commissioner Prashant Kumar Singh resigned. He cited defending the government's honor as his duty, expressing distress over divisive language used by a religious figure. He informed his wife of his decision tearfully.
Web Summary : मुख्यमंत्री योगी के खिलाफ आलोचना से परेशान होकर जीएसटी उपायुक्त प्रशांत कुमार सिंह ने इस्तीफा दे दिया। उन्होंने सरकार के सम्मान की रक्षा को अपना कर्तव्य बताया और एक धार्मिक व्यक्ति द्वारा इस्तेमाल की गई विभाजनकारी भाषा पर दुख व्यक्त किया। उन्होंने रोते हुए अपनी पत्नी को अपने फैसले की जानकारी दी।