शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

...म्हणून तरुण फिरवतात शेतीकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 14:47 IST

शेतीशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या आणि घेत असलेल्या तरुण विद्यार्थ्यांनीही शेतीकडे पाठच फिरवली आहे

‘आपला देश शेतीप्रधान आहे. देशातील ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत’, हे वर्षानुवर्षे आपण ऐकत आलोत, पण खरंच शेती किती जण करतात, शेती करणाऱ्यांची संख्या किती आहे, हे आपल्याला माहीत आहे का?

यासंदर्भातली वस्तुस्थिती समजून घेतली तर आपल्याला धक्का बसेल. बेभरोशी शेती आणि जगण्याची ऐशीतैशी, हे वास्तव कायमच डोळ्यांसमोर असल्यानं ग्रामीण भागातही शेती करण्यास आता कोणी तयार नाही. शेतीतील तरुण मुलांची संख्या तर झपाट्यानं कमी होत आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वयही वाढत चाललंय.

‘डाऊन टू अर्थ’ या संस्थेचे अभ्यासक रिचर्ड महापात्रा यांच्या अभ्यासानुसार काळ्या मातीत धान्य पिकवणाऱ्या आणि देशाला ‘जगवणाऱ्या’ शेतकऱ्यांचं भारतातलं सरासरी वय पन्नाशीच्या पार गेलं आहे. २०१६ मध्ये केलेल्या एका पाहणीत भारतीय शेतकऱ्यांचं सरासरी वय होतं ५० वर्षे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार भारतात दररोज सरासरी दोन हजार शेतकरी शेतीला रामराम ठोकताहेत.

यासंदर्भातलं वास्तव इतकं धक्कादायक आहे, की शेतकी विद्यापीठातून शेतीशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या आणि घेत असलेल्या तरुण विद्यार्थ्यांनीही शेतीकडे पाठच फिरवली आहे आणि शेती सोडून दुसऱ्या क्षेत्राकडे त्यांनी आपले लक्ष वळवले आहे. अर्थातच याचं कारणही स्पष्ट आहे. लहरी हवामान आणि बेभरोशी शेती. इतर क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा किमान पाच पटीनं अधिक आहे.

यासंदर्भात ‘प्रथम’ या संस्थेनं २०१७ साली तीस हजार तरुणांचा एक अभ्यास केला. या अभ्यासानुसार यातील केवळ १.२ टक्के तरुणांना शेती हा व्यवसाय म्हणून स्वीकारायचा होता, १८ टक्के तरुणांनी आर्मीला तर १२ टक्के तरुणांनी इंजिनिअरिंगला पसंती दिली होती. शेतीत महिलांचा वाटाही प्रचंड मोठा आहे, पण २५ टक्के महिलांनी शिक्षकी पेशाला पसंती दिली होती.

‘प्रथम’ या संस्थेचे संस्थापक माधव चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार शेतीतील तरुणांची संख्या कमी होते आहे, हे तर खरेच, पण शेतीच शेतकऱ्यांना बाहेर काढतेय, हेही यासंदर्भातलं एक मोठं वास्तव आहे. भारताची लोकसंख्या जशी वाढतेय, तशीच घरकुलांची संख्याही. गेल्या दहा वर्षांत घरकुलांची संख्या तब्बल ३३ टक्क्यांनी वाढलीय. त्यामुळेही शेती परवडेनाशी झालीय.

अर्थातच ही स्थिती फक्त भारतातच आहे असं नाही, अख्ख्या जगभरातल्या तरुणांना शेती नकोशी आहे. अमेरिकेत आज शेतकऱ्यांचं सरासरी वय आहे ५८ वर्षे, तर जपानमध्ये ६७ वर्षे. युरोपमधला प्रत्येक तिघांतला एक शेतकरी पासष्टीच्या पुढचा आहे. पुढच्या सहा वर्षांत जपानमधल्या ४० टक्के शेतकऱ्यांनी शेती सोडलेली असेल, अशी स्थिती आहे.

२०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १९० कोटीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. अशावेळी अन्नधान्याचं उत्पादन हे भारतापुढचं सर्वोच्च असणार आहे. मात्र याच विपरित स्थितीत आशेचा एक किरणही डोकावतो आहे. जगभरात शेतकऱ्यांची ‘डिमांड’ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यानं खोऱ्यानं पैसे मिळवण्याची अनोखी संधीही त्यांच्यापुढे चालून येणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीIndiaभारतResearchसंशोधन