शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

आता रॉबर्ट वाड्रांची होणार 'ईडी'कडून चौकशी?, कोर्टात अटकेची याचिका

By मोरेश्वर येरम | Updated: January 17, 2021 18:19 IST

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीकडून रॉबर्ट वाड्रा आणि महेश नागर यांना अटक करुन त्यांच्या चौकशीची परवानगी हायकोर्टाकडे मागण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढणारबेहिशेबी मालमत्तेप्रकरणी होणार चौकशीईडीची रॉबर्ट वाड्रांविरोधात हायकोर्टात याचिका

नवी दिल्लीउद्योगपती आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात राजस्थान हायकोर्टात अटकेची याचिका दाखल केली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ईडीकडून रॉबर्ट वाड्रा आणि महेश नागर यांना अटक करुन त्यांच्या चौकशीची परवानगी हायकोर्टाकडे मागण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रॉबर्ट वाड्रा यांची एएसजी राजदीपक रस्तोगी, तर ईडीकडून भानुप्रताप बोहरा बाजू मांडणार आहेत. 

नेमकं प्रकरण काय?२००७ साली वाड्रा यांनी स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली होती. रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्या मातोश्री मौरीन या कंपनीच्या संचालक पदावर आहेत. त्यानंतर कंपनीचं नाव बदलून स्कायलाइट हॉस्पीटॅलिटी लिमिटेड लायबिलीटी करण्यात आलं. कंपनीच्या नोंदणीवेळी ही कंपनी रेस्टॉरंट, बार आणि कॅंटीन चालविण्याच्या क्षेत्रात काम करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 

२०१२ साली खरेदी केली होती जमीनवाड्रा यांच्या कंपनीने २०१२ साली जोधपूरच्या कोलायत येथे काही दलालांच्या माध्यमातून २७० बिघा जमीन ७९ लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. ही जमीन बिकानेर येथील भारतीय सेनेच्या महाजन फील्ड फायरिंग रेंजसाठी देण्यात आली होती. तर येथून विस्थापित झालेल्यांसाठी दुसऱ्या ठिकाणी १४०० बिघा जमीन देण्यात आली होती. पण काही लोकांनी या जमिनीचे खोटी कादगपत्र तयार करुन वाड्राच्या कंपनीला विकण्यात आले होती.  

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान