पंचवटीत विद्यार्थ्याचे अपहरण करून लूट
By Admin | Updated: July 11, 2015 00:15 IST2015-07-11T00:15:20+5:302015-07-11T00:15:20+5:30
पेठरोडवरील घटना : चालत्या रिक्षातून उडी घेऊन विद्यार्थ्याने वाचविले स्वत:चे प्राण

पंचवटीत विद्यार्थ्याचे अपहरण करून लूट
प ठरोडवरील घटना : चालत्या रिक्षातून उडी घेऊन विद्यार्थ्याने वाचविले स्वत:चे प्राणनाशिक : मित्राला मारण्याची सुपारी दिल्याचे कारण सांगत विद्यार्थ्याचे रिक्षातून अपहरण करून लुटल्याचा प्रकार पंचवटीतील पेठरोड परिसरात शुक्रवारी (दि़१०) सकाळी घडला़ या विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत चालत्या रिक्षातून उडी घेत स्वत:चे प्राण वाचवले असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरण व लुटीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़धात्रक फाटा परिसरात राहणारा मितेश विजय गावित हा शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास इंद्रकुंड परिसरात खासगी शिकवणीसाठी गेला होता़ त्यास शिक्षक पवन जोशी यांनी काही कागदपत्रांच्या छायांकित प्रती काढण्यासाठी पाठविले़ त्यानुसार छायांकित प्रती घेऊन येत असताना त्यास एका संशयिताने अडवले व तुझ्या मित्राला मारण्याची सुपारी दिल्याचे सांगून पाठीला चाकू लावला व बळजबरीने रिक्षात बसविले़यानंतर रिक्षा पेठरोडच्या दिशेने नेऊन मितेशच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावून घेत वडीलांचा मोबाईल नंबर मागीतला़ या प्रसंगातही मितेशने धारिष्ट्य दाखवत चालत्या रिक्षातून उडी घेऊन पंचवटी पोलीस ठाणे गाठून अधिकार्यांना आपबिती सांगितली़ तसेच त्याने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी एमएच १५, एके ६११० या रिक्षासह चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ दरम्यान मितेश हा इगतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांचा जवळचा नातेवाईक असल्याचे वृत्त आहे़(प्रतिनिधी)