रेल्वे लाईन भागात रोकड, दागिने पळविले

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:41+5:302015-06-15T21:29:41+5:30

सोलापूर : रेल्वे लाईन भागात राहणार्‍या विजयालक्ष्मी भालचंद्र वडापूरकर यांच्या घरातून रोकड आणि दागिने पळविल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली.

Roads and jewelery in the railway line | रेल्वे लाईन भागात रोकड, दागिने पळविले

रेल्वे लाईन भागात रोकड, दागिने पळविले

लापूर : रेल्वे लाईन भागात राहणार्‍या विजयालक्ष्मी भालचंद्र वडापूरकर यांच्या घरातून रोकड आणि दागिने पळविल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली.
विजयालक्ष्मी वडापूरकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य रात्री जेवण करून झोपी गेले. मध्यरात्रीनंतर चोरट्याने उघड्या खिडकीतून घरात प्रवेश मिळविला. आतील बेडरुममधील कपाटात असलेले 28 हजार रुपये आणि 7 हजार रुपयांचे दागिने हातोहात पळविले. आज (सोमवारी) सायंकाळी 4 वाजता विजयालक्ष्मी यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार पठाण करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Roads and jewelery in the railway line