देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:17 IST2025-12-06T11:14:57+5:302025-12-06T11:17:05+5:30
फेब्रुवारी २०२० मध्ये रस्ते सुरक्षाविषयक जागतिक संमेलनातल्या जाहीरनाम्यात २०३० पर्यंत रस्ते अपघातांत होणारे मृत्यू व जखमींचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य...

देशात रस्ते अपघाताने घेतला १.७७ लाख जणांचा जीव, रस्ते परिवहन-महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २०२४ मध्ये २.३ टक्क्यांनी वाढली असून, १.७७ लाख नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत शुक्रवारी दिली.
गडकरी म्हणाले की, फेब्रुवारी २०२० मध्ये रस्ते सुरक्षाविषयक जागतिक संमेलनातल्या जाहीरनाम्यात २०३० पर्यंत रस्ते अपघातांत होणारे मृत्यू व जखमींचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
‘वक्फ’ संपत्तीच्या नोंदणीची मुदत सहा महिने वाढवा
‘उम्मीद’ पोर्टलवर वक्फ संपत्तीच्या नोंदणीची मुदत शुक्रवारी संपली. तत्पूर्वी काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी लोकसभेत नोंदणीची मुदत सहा महिन्यांसाठी वाढवण्याची मागणी केली. आता ३० टक्के संपत्तीच्याही नोंदी होऊ शकल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
गुटख्याचा प्रचार करणाऱ्या ‘नटां’चे पुरस्कार परत घ्या
पान मसाला आणि गुटख्याचा प्रचार करणाऱ्या चित्रपट कलाकारांना दिले गेलेले सर्व पुरस्कार परत घेण्याची मागणी राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे हनुमान बेनीवाल यांनी लोकसभेत केली. कायद्याची अंमलबजावणी महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
पान मसाल्यावर उपकर
पान मसाल्यावर उपकर लागू करण्यासंबंधीच्या तरतुदीला लोकसभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या विधेयकातील तरतुदींत सुचवलेल्या सर्व दुरुस्त्या फेटाळल्या.