लालू प्रसाद यादव ऐनवेळी बाजी पलटवणार?; तेजस्वी यादवांना CM करण्यासाठी टाकला हा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 05:36 PM2024-01-26T17:36:23+5:302024-01-26T17:37:17+5:30

जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

rjd Lalu Prasad Yadavs strategy to make Tejashwi Yadav CM | लालू प्रसाद यादव ऐनवेळी बाजी पलटवणार?; तेजस्वी यादवांना CM करण्यासाठी टाकला हा डाव

लालू प्रसाद यादव ऐनवेळी बाजी पलटवणार?; तेजस्वी यादवांना CM करण्यासाठी टाकला हा डाव

Bihar Politics ( Marathi News ) :बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा शेवटचा अंक लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता असून जेडीयू-आरजेडी महाआघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होणार असून याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं समजते. नितीश कुमार यांच्या एनडीए प्रवेशात सध्या बिहारमध्ये सत्तेत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीची कोंडी होणार आहे. या पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादवही ऐनवेळी अनोखा डाव टाकत भाजप आणि जेडीयूला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. 

पुत्र तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसाद यादव ही आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आरजेडीलाही अवघ्या काही आमदारांची आवश्यकता आहे. एमआयएम, हम पार्टी यांच्या मदतीने लालू प्रसाद यादव यांनी हा आकडा १२० वर नेला असून त्यांना आता केवळ दोन आमदारांची गरज भासणार आहे. त्यासाठी जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

दरम्यान, नितीश कुमारांच्या जेडीयूने भाजपसोबत जाण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. मात्र नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. नितीश कुमारांना मुख्यमंत्री दिलं तर आपल्या हक्काच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यातूनच नितीश कुमारांच्या एनडीएतील घरवापसीची घोषणा रखडली आहे.

Web Title: rjd Lalu Prasad Yadavs strategy to make Tejashwi Yadav CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.