शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अखेर ठरले! बिहारमध्ये महाआघाडीच्या जागावाटपाचे घोडे गंगेत न्हाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:01 PM

सर्वच घटकपक्षांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे खोळंबलेले बिहारमधील महाआघातील जागावाटपाचे घोडे अखेर आज गंगेत न्हाले.

पाटणा - सर्वच घटकपक्षांनी घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे खोळंबलेले बिहारमधील महाआघातील जागावाटपाचे घोडे अखेर आज गंगेत न्हाले. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या खलबतांनंतर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा केली. ठरलेल्या जागावाटपानुसार बिहारमध्ये राजद 19, काँग्रेस 9 आणि आरएलएसपी 5 जागांवर निवडणूक लढवणार आहे. हम आणि व्हीआयपी पक्षांना प्रत्येकी तीन तर सीपीआय (माले) पक्षाला 1 जागा देण्यात आली आहे. बिहामधील महाआघाडीतील जागावाटपाची घोषणा करताना तेजस्वी यादव यांनी सांगितले की, ''राष्ट्रीय जनता दल (राजद) बिहारमधील 19 जागांवर निवडणूक लढवणार आहे. जागावाटपामध्ये भागलपूर, बांका, मधेपुरा आणि दरभंगा हे मतदारसंघ राजदच्या वाट्याला आले आहेत. तर काँग्रेस 9 जागांवर निवडणूक लढणार आहे. तसेच जागावाटपात कळीचा विषय ठरलेला पाटणा साहिब मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला आहे. महाआघाडीत सहभागी झालेल्या आरएलएसपीलाही 5 जागा देण्यात आल्या आहेत.''  दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद यादव हे मधेपुरा येथून निवडणूक लढवतील. तर सर्फराज आलम हे अररिया आणि मिसा भारती पाटलीपुत्र येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, अशी माहितीही तेजस्वी यादव यांनी दिली. जागावाटपामध्ये पाटणा साहिब मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने शत्रुघ्न सिन्हा यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

महाआघाडीने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे आहेत. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेसBiharबिहार