शहरं
Join us  
Trending Stories
1
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
2
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
3
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
4
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
5
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
6
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
7
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
8
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
9
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
10
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
11
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
12
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
13
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
14
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
15
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
16
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
17
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
18
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
19
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
20
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचा उदय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 5:51 AM

महाराष्ट्रात ४५ जागा होत्या. त्यापैकी ४२ जागा काँग्रेसने जिंकून बालेकिल्ला पुन्हा सांभाळला. नागपुरातून फॉरवर्ड ब्लॉकचे जांबुवंतराव धोटे, राजापुरात प्रा. मधू दंडवते विजयी झाले होते. पंढरपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे निवृत्ती कांबळे विजयी झाले.

- वसंत भोसलेमहाराष्ट्रात ४५ जागा होत्या. त्यापैकी ४२ जागा काँग्रेसने जिंकून बालेकिल्ला पुन्हा सांभाळला. नागपुरातून फॉरवर्ड ब्लॉकचे जांबुवंतराव धोटे, राजापुरात प्रा. मधू दंडवते विजयी झाले होते. पंढरपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे निवृत्ती कांबळे विजयी झाले. त्यांची काँग्रेसशी आघाडीच होती. महाराष्ट्राशिवाय उत्तर प्रदेश ८५ पैकी ७३, कर्नाटक २७ पैकी सर्व जागा, आंध्र, बिहार, राजस्थान, आदी राज्यांत काँग्रेसने प्रचंड यश मिळविले.लोकसभेची पाचवी निवडणूक मार्च, १९७१ मध्ये झाली. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या नेतृत्वासाठी आणि पंतप्रधानपदासाठी संघर्ष सुरू झाला होता. नेता निवडीच्यावेळी इंदिरा गांधी विरुद्ध मोरारजी देसाई अशी लढत झाली. त्यात इंदिरा गांधी विजयी झाल्या. मात्र, अंतर्गत धुसफूस काही संपली नाही. अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन १९६९मध्ये बंगलोरमध्ये घेण्यात येणार होते. त्याच्या अध्यक्षपदी कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगाप्पा होते. या अधिवेशनावर इंदिरा गांधी यांना मानणाऱ्या गटाने बहिष्कारच घातला. पंतप्रधानपदी असणाऱ्या इंदिरा गांधी यांनाच काँग्रेसमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस पक्षात मोठीच फूट पडली.काँग्रेस कार्यकारिणीच्या ७०७ सदस्यांपैकी ४१८ सदस्यांनी इंदिरा गांधी यांचे नेतृत्व स्वीकारले. लोकसभा व राज्यसभेच्या केवळ ३१ खासदारांनी मूळ काँग्रेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. उर्वरित सर्वच खासदारांनी इंदिरा गांधी यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याने पक्षातून काढून टाकले असले तरी त्यांचे पंतप्रधानपद कायम राहिले. मोरारजी देसाई व एस. निजलिंगप्पा यांना तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते के. कामराजही मिळाले होते.इंदिरा गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेसची नव्याने स्थापना केली. या दोन्ही गटांना सिंडीकेट काँग्रेस व इंडिकेट काँग्रेस असे म्हटले जाऊ लागले. सिंडीकेट काँग्रेस ऊर्फ संघटना काँग्रेसने पाचव्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसविरोधात महागठबंधन केले. त्यात जनसंघ, प्रजा समाजवादी पक्ष, संयुक्त समाजवादी पक्ष व स्वतंत्र पक्ष सामील झाला होता.दरम्यानच्या काळात इंदिरा गांधी यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेऊन ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. आपला पक्ष गरिबांच्या कल्याणासाठी झटणारा आहे, अशी प्रतिमा उभी करण्यात त्या यशस्वी झाल्या. मार्च १९७१ मध्ये निवडणुका जाहीर झाल्या. इंदिरा गांधी यांना नेतृत्व सिद्ध करायची ही पहिलीच वेळ होती.त्यांनी देशव्यापी दौरे करून संघटना काँग्रेस आणि चार प्रमुख विरोधी पक्षांच्या महागठबंधनावर जोरदार टीकास्त्र चालविले. विरोधकांनी बिगरकाँग्रेसवादाचे तत्त्वज्ञान मांडले. त्यात काँग्रेस विचाराधारा, संघाची विचारसरणी असलेले जनसंघवाले, समाजवादी विचाराचे दोन्ही पक्ष एकत्र येऊ नही त्या सर्वांचा निवडणुकीत धुव्वा उडाला. लोकसभेच्या ५१८ जागा होत्या. त्यापैकी काँग्रेसने ४४१ जागा लढवून ३५२ जागांवर विजय संपादन केला. काँग्रेसला ४३.६८ टक्के मते मिळाली.एकूण २७ कोटी ४१ लाख ८९ हजार १३२ मतदार या निवडणुकीत होते. त्यापैकी ५५.४७ टक्के मतदान झाले होते. संघटना काँग्रेसने २३८ जागा लढविल्या होत्या, मात्र त्यांना केवळ सोळा जागा मिळाल्या. त्यापैकी निम्म्या जागा गुजरातमधील होत्या. संघटना काँग्रेसचे नेते मोरारजी देसाई सुरतमधून विजयी झाले होते. जनसंघाने १५७ जागा लढविल्या आणि २२ जिंकल्या. अटलबिहारी वाजपेयी ग्वाल्हेरमधून निवडून आले. प्रजा समाजवादी पक्षाला केवळ दोन , तर संयुक्त समाजवादी पक्षाला तीन आणि स्वतंत्र पक्षाला आठ जागा मिळाल्या. या महागठबंधनाला एकूण ५१ जागा मिळाल्या.याउलट भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ४३, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने २५ जागा जिंकल्या होत्या. तामिळनाडूमध्ये द्रमुकने २३ जागा मिळविल्या. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वापुढे विरोधकांचा अक्षरश: पालापाचोळा झाला. या निवडणुकीने इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबच झाले.या निवडणुकीतील इंदिरा गांधी यांचा ‘गरिबी हटाव’चा नारा गाजला होता. त्यांच्या पक्षाला गायवासरू चिन्ह मिळाले होते. ‘गाय वासरू, नका विसरू’ ही घोषणा गाजली होती.(उद्याच्या अंकात -  आणीबाणीचा भारतीय लोकशाहीवरील डाग!)

टॅग्स :Indira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक