शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुलायम सिंहांच्या कुटुंबात पुन्हा फूट, धाकटी सून काका शिवपाल यांच्या गटात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 08:53 IST

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा फूट पडली आहे.

लखनौ  - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा फूट पडली आहे. मुलायम सिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव या शनिवारी समाजवादी सेक्युलर मोर्चाचे अध्यक्ष शिवपाल यादव यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. शिवपाल यादव आणि अपर्णा यादव एकाच मंचावर आल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. 

या कार्यक्रमात अपर्णा यादव यांनी, समाजवादी सेक्युलर मोर्चाला मजबूत करण्याचे आवाहन केले. तसेच समाजवादी सेक्युलर मोर्चा भक्कम होईल, तसेच मी स्वत: काका शिवपाल यांच्यासोबत उभी राहीन, असे त्यांनी सांगितले.  शिवापाल यादव शनिवारी लखनौ येथे राष्ट्रीय क्रांतिकारी समाजवादी पार्टीच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अपर्णा यादव सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. शिवपाल आणि अपर्णा यादव यांचे एकाच मंचावर एकत्र येणे हे उत्तर प्रदेशमधील बदललेल्या साजकीय समीकरणांचा नमुना मानला जात आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये शिवपाल यादव यांनी कुटुंबातील दोन दिग्गजांना आपल्या बाजूने उभे केले आहे.   यावेळी कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार? असे विचारले असता अपर्णा यादव यांनी याबाबत काका शिवपाल यादव माहिती देतील, असे सांगितले. तर शिवपाल यादव यांनी आम्ही आपल्या पक्षासोबत काही छोट्या पक्षांना घेऊन चांगले काम करण्यासाठी निघालो आहोत. समान विचारसणीचे लोक एकत्र येतील. तसेच शेतकरी, तरुणा णि मुस्लिमांचे जे प्रश्न आहेत ते दूर करण्याचे काम आमचा पक्ष करेल, असे सांगितले.  

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेश