राम रहीमच्या हनीप्रीतची माहिती देणाऱ्याला मिळणार बक्षीस, सामाजिक कार्यकर्त्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 21:57 IST2017-09-22T21:54:39+5:302017-09-22T21:57:01+5:30

दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याची मानस मुलगी हनीप्रीत सध्या फरार आहे. तिची माहिती देण्या-या व्यक्तीला बक्षीस देण्याची घोषणा एका सामाजिक कार्यकर्त्याने केली  आहे.

The reward for the information provided by Ram Rahim Honeypreet, a reward for the social worker will be announced | राम रहीमच्या हनीप्रीतची माहिती देणाऱ्याला मिळणार बक्षीस, सामाजिक कार्यकर्त्याची घोषणा

राम रहीमच्या हनीप्रीतची माहिती देणाऱ्याला मिळणार बक्षीस, सामाजिक कार्यकर्त्याची घोषणा

ठळक मुद्देहनीप्रीतची माहिती देणाऱ्या व्यक्तीस बक्षीस हनीप्रीत सध्या फरार आहेहनीप्रीतचे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत

शाहजहांपुर, दि. 22 - दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याची मानस मुलगी हनीप्रीत सध्या फरार आहे. तिची माहिती देण्या-या व्यक्तीला बक्षीस देण्याची घोषणा एका सामाजिक कार्यकर्त्याने केली  आहे.
हनीप्रीतचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. हनीप्रीतला पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. मात्र, अद्याप हनीप्रीत पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हनीप्रीतची माहिती देणाऱ्या व्यक्तीस बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.  फकीरेलाल भोजवाल असे या समाजसेवकाचे नाव असून त्यांनी हनीप्रीतची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपये रोकड देण्याची घोषणा केली आहे. तसेच, शहरातील अनेक भागात हनीप्रीतचे पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी समाजसेवक फकीरेलाल भोजवाल यांनी सांगितले की, समाजात असे अनेक बाबा आहेत, जे लोकांच्या भावनांसोबत खेळत आहेत. अशा बाबांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे. हनीप्रीतची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी सुद्धा बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मी स्वत: हनीप्रीतची माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला 25 ऑगस्टला बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी 25 ऑगस्टला हिंसाचार माजवला. या हिंसाचारात 38 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. तसेच, यामध्ये पोलिसही जखमी झाले. दरम्यान,या हिंसाचारामागे हनीप्रीत हिचा हात असल्याचा आरोप आहे. या हिंसाचारानंतर ती फरार झाली असू तिचा पोलीस शोध घेत आहेत. 
दुसरीकडे, आज हनीप्रीत आणि बाबा गुरमीत राम रहीम यांच्या नात्यासंबंधी विश्वास गुप्ताने धक्कादायक खुलासे केले आहेत. विश्वास गुप्ता हनीप्रीतचा पूर्वपती आहे. मी राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड, सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकार परीषदेत सांगितले. मी जेव्हा दोघांना एकत्र सेक्स करताना पकडले तेव्हा राम रहीमने मला जीवे मारण्याची धमकी दिली होती असेही विश्वास गुप्ताने  सांगितले. 

Web Title: The reward for the information provided by Ram Rahim Honeypreet, a reward for the social worker will be announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.