पंचकुला -  हनीप्रीत आणि बाबा गुरमीत राम रहीम यांच्या नात्यासंबंधी विश्वास गुप्ताने धक्कादायक खुलासे केले आहेत. विश्वास गुप्ता हनीप्रीतचा पूर्वपती आहे. मी राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड,  सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकार परीषदेत सांगितले. मी जेव्हा दोघांना एकत्र सेक्स करताना पकडले तेव्हा राम रहीमने मला जीवे मारण्याची धमकी दिली होती असे विश्वास गुप्ताने  सांगितले. 

हनीप्रीत आपली दत्तक मुलगी असल्याने राम रहीमने जाहीर केले होते. पण दत्तक घेण्याची कायदेशीररित्या प्रक्रिया पूर्ण केली नव्हती असे विश्वासने सांगितले. हनीप्रीतला मुलगी बनवल्यामुळे तिचा डे-यामध्ये राहण्याचा मार्ग मोकळा झाला. राम रहीम सर्वांसमोर हनीप्रीतला मुलगी आणि माझी जावय म्हणून ओळख करुन द्यायचा. 

हनीप्रीत राम रहीमच्या खोलीत गेल्यानंतर मी बाहेर बसून राहायचो. मी बाबांची सेवा करायला जाते असे हनीप्रीत सांगायची. ती राम रहीमच्याच बिछान्यावर झोपायची असे खळबळजनक गौफ्यस्फोट विश्वास गुप्ताने केले आहेत. सिरसामध्ये डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय आहे. तिथेच राम रहीमची गुफा होती. या गुफेमध्ये राम रहीम आम्हाला बिग बॉससारखे खेळ खेळायला लावायचा. आम्ही सहा जोडया होतो तिथे आम्ही 28 दिवस घालवले असे विश्वास गुप्ताने सांगितले. राम रहीम आणि हनीप्रीतने मला अनेकवेळा धमकावले. त्यांनी मला मारण्याचीही धमकी दिली होती असे विश्वास गुप्ताने सांगितले. 

2009 पर्यंत डे-याच्या व्यवस्थापनामध्ये पुरुषांकडे महत्वाची भूमिका असायची. पण 2009 नंतर हनीप्रीत सक्रीय झाल्यानंतर महिलांकडे महत्वाच्या जबाबदा-या सोपवल्या जाऊ लागल्या असे विश्वास गुप्ताने सांगितले. राम रहीमने 2009 मध्ये हनीप्रीतला दत्तक घेतले. प्रियांका तनेजा तिचे खरे नाव आहे. 1999 साली गुरमीत राम रहीमच्या सांगण्यावरुन मी हनीप्रीत बरोबर लग्न केले. 2011 साली विश्वासने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. 

मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये हनीप्रीत टॉपला

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला 25 ऑगस्टला बलात्कार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले. यानंतर पंचकुला, सिरसा व हरयाणाच्या अन्य भागांत झालेल्या हिंसाचारप्रकरणी हरयाणा पोलिसांनी 43 जणांची मोस्ट वाँटेड लिस्ट जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये राम रहीमची मानस मुलगी हनीप्रीत सिंग आणि डेसा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्य इन्सा यांची नावे टॉपला आहेत. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.