लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:40 IST2025-07-18T12:39:42+5:302025-07-18T12:40:21+5:30

लेकीच्या जन्माचा आनंद साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

rewa innocent son swept away from home door in flood next day of his sister was born | लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

फोटो - आजतक

लेकीच्या जन्माचा आनंद साजरा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण मुलीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील रेवा येथील एका कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. कुटुंबाच्या घराजवळून एक नाला जातो. अचानक या नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. याच दरम्यान या पुरामध्ये मुलगा वाहून गेला. प्रशासन आणि एसडीआरएफ टीम मुलाचा शोध घेत आहे.

अमहिया पोलीस स्टेशन परिसरातील विवेकानंद नगरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पूनम गुप्ता हिने बुधवारी संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एका मुलीला जन्म दिला. गुरुवारी ती रुग्णालयातून घरी पोहोचली. घरात आनंदाचे वातावरण होतं. याच दरम्यान अचानक पूर आला आणि पूनम गुप्ता यांचा मुलगा रुद्रांश पुरात वाहून गेला. वडील विजय गुप्ता यांनी सांगितलं की, दीड वर्षांचा दाराबाहेर गेला होता. नाल्यातील पाण्याची पातळी वेगाने वाढली आणि रुद्रांश वाहून गेला.

हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू

तहसीलदार शिवशंकर शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मुलाचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेनंतर, कुटुंब रडत आहे आणि त्यांची अवस्था वाईट आहे. जिल्ह्यात पावसानंतर नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नाल्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे, निवासी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्याचाच फटका गुप्ता कुटुंबाला बसला आहे.

महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या नाल्यांवर प्रचंड अतिक्रमण आहे आणि पावसापूर्वी या नाल्यांची साफसफाईही करण्यात आली नव्हती. त्यामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली की सामान्य नाल्यांमधून येणारे पाणी लोकांच्या बेडरूममध्ये पोहोचलं आहे. अशातच पाणी वाढलं आणि रुद्रांश वाहून गेला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 
 

Web Title: rewa innocent son swept away from home door in flood next day of his sister was born

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.