कुंभवॉकमध्ये सिंहस्थ उपाय योजनांचा आढावा गोदावरीच्या पाण्याने नायट्रोजनची पातळी ओलांडली
By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:37+5:302015-07-10T23:13:37+5:30
नाशिक : किलार्ेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत शुक्रवारी (दि. १०) कुंभवॉकचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने कोणत्या प्रकारची तयारी करण्यात आली आहे हे जाणून घेण्यासाठी सिंहस्थ मेळा भरणार त्या ठिकाणी भेट देण्यात आली.

कुंभवॉकमध्ये सिंहस्थ उपाय योजनांचा आढावा गोदावरीच्या पाण्याने नायट्रोजनची पातळी ओलांडली
न शिक : किलार्ेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत शुक्रवारी (दि. १०) कुंभवॉकचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक मध्ये होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने कोणत्या प्रकारची तयारी करण्यात आली आहे हे जाणून घेण्यासाठी सिंहस्थ मेळा भरणार त्या ठिकाणी भेट देण्यात आली.यावेळी अमित टिल्लू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वॉकअंतर्गत प्रशासनाने केलेल्या उपाययोजना फोल ठरल्याचे चित्र बघायला मिळाले. नदी प्रदूषण जैसे थे असून गाडगे महाराज पुलाजवळ गोदावरी नदी मृतावस्थेत गेल्याचे जाणवत असल्याचे टिल्लू यांनी सांगितले. नदीच्या पाण्यात नायट्रोजनचे प्रमाण वाढले असून त्याने धोक्याची पातळी ओलांडली असल्याचेही आढळून आले; आणि अशा परिस्थितीत कुंभमेळा कसा भरवला जातो ही चिंतेची बाब आहे. या वॉकसाठी शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.(फोटो = आर फोटो मध्ये वसुंधरा १,२,३ नावाने सेव्ह आहेत)