शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे पथक घेणार पोषण आहाराचा आढावा

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

जिल्हा परिषद : २ ते १० फेब्रुवारी दरम्यान तपासणी नागपूर : शालेय विद्यार्थ्यांची उपासमार थांबावी, शाळेतील उपस्थिती वाढावी या हेतूने शासनामार्फत विद्यार्थ्याना पोषण आहार पुरविला जातो. या योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे पथक २ ते १० फेबु्रवारी दरम्यान नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ...


जिल्हा परिषद : २ ते १० फेब्रुवारी दरम्यान तपासणी
नागपूर : शालेय विद्यार्थ्यांची उपासमार थांबावी, शाळेतील उपस्थिती वाढावी या हेतूने शासनामार्फत विद्यार्थ्याना पोषण आहार पुरविला जातो. या योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे पथक २ ते १० फेबु्रवारी दरम्यान नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.
जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते ५वी पर्यंतच्या २,६७० शाळांतील २ लाख ४६ हजार १४६ तर इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंच्या १,३७५ शाळांतील १ लाख ८९ हजार ९९ विद्यार्थ्यांना या योजनेला लाभ दिला जातो. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून ही योजना राबविली जाते. यात केंद्र शासनाचा ७५ तर राज्य शासनाचा २५ टक्के वाटा आहे.
पोषण आहारातून विद्यार्थ्यांना आवश्यक उष्मांक व प्रोटिन्स मिळणे अपेक्षित आहे. यासाठी आठवड्याचे मेनूकार्ड निश्चित करण्यात आलेले आहे. आठवड्यातून एक दिवस पूरक पोषण आहार द्यावयाचा आहे. यात फळे, बिस्किट यांचा समावेश असतो. यासाठी शाळा स्तरावर समिती गठित करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील ३०० महिला बचतगटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. ही योजना प्रभावीपणे राबविली जावी. यात लोकसहभाग असावा असे सरकारला अभिप्रेत आहे. यासाठी गेल्या २ वर्षातील रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे. त्रुटी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
चौकट ....
पथक पुढील बाबी तपासणार
पटसंख्येनुसार आहार शिजवला जातो की नाही.
तांदूळ शिल्लक राहतो का, असल्यास का राहतो.
रेकॉर्डनुसार उपलब्ध तांदूळ आहे की नाही.
धान्य ठेवण्याची जागा सुरक्षित आहे की नाही.
किचनशेडची सुविधा, मेनूतील विविधता
खर्चाचा हिशेब योग्य आहे की नाही.
पोषण आहार समितीच्या बैठका होतात की नाही.
चौकट..........
योजनेतील त्रुटी.......
-सरकारकडून निधी मिळण्याला विलंब
-अपुरा निधी व निकृष्ट धान्याचा पुरवठा
-किचनशेडचा अभाव
-लोकसभहभागाचा अभाव
चौकट...........
जिल्हा अधीक्षकांचा दुजोरा
पोषण आहार योजनेचा आढावा घेण्यासाठी २ ते १० फेब्रुवारी दरम्यान केंद्र सरकारचे १० ते १२ जणांचे पथक येत असल्याला शालेय पोषण आहार योजनेचे जिल्हा अधीक्षक नीलेश वाघमारे यांनी दुजोरा दिला आहे.
.........................