Revenge for the killing of a soldier in 24 hours; 12 terrorists killed in 72 hours | 24 तासात जवानाच्या हत्येचा घेतला बदला; 72 तासांत 12 दहशतवाद्यांचा खात्मा

24 तासात जवानाच्या हत्येचा घेतला बदला; 72 तासांत 12 दहशतवाद्यांचा खात्मा

ठळक मुद्दे रविवारी सकाळी चकमकी पुन्हा सुरू झाल्या आणि त्यात दोन अतिरेकी ठार झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

श्रीनगर -  जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलांची कारवाई झपाट्याने सुरू असून 72 तासात सुरक्षा दलांनी खोऱ्यातील 12 अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. इतकेच नव्हे तर शनिवारी भारतीय लष्कर प्रांतातील लष्कराच्या जवानाला ठार करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा देखील करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने 24 तासात सैन्याच्या जवानाच्या हत्येचा बदला घेतला आहे. जम्मू-काश्मीरपोलिसांचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी ही सर्व माहिती दिली आहे.

जम्मू-काश्मीरचे पोलिस डीजीपी दिलबाग सिंह यांच्या मते,  बिजबेहारामध्ये  दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी सुरू केलेले ऑपरेशन संपले आहे, ते म्हणाले की, १२ तासांत दहशतवाद्यांविरूद्ध वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत १२ दहशतवादी ठार झाले. ७ दहशतवादी त्राल आणि सोपिया येथे मारले गेले. दहशतवादी संघटना अल बद्रचे 3 दहशतवादी हरिपोरामध्ये मारले गेले आहेत आणि आता बिजबेहारामध्ये लश्करचे २ दहशतवादी ठार झाले आहेत.

“दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा भागात सेमथन येथे झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले.” एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने तेथे घेराव घालत शोध मोहिम राबविली. त्यानंतर ते म्हणाले, शनिवारी चकमकीला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत चकमकी सुरू राहिल्या आणि अतिरेक्यांना पळण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा दलाने त्या भागाला वेढा घातला.

रविवारी सकाळी चकमकी पुन्हा सुरू झाल्या आणि त्यात दोन अतिरेकी ठार झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. शोध मोहीम अजूनही सुरू आहे. शुक्रवारी बिजबेहरा परिसरातील गोरीवन येथील हवालदार मोहम्मद सलीम अखून याच्या घराबाहेर हत्या करण्यात या दहशतवाद्यांचा समावेश होता असल्याचे पोलिसांनी सांगितले. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले की, बिजबेहरा चकमकीत सैन्याच्या जवानाला ठार मारण्यासाठी जबाबदारी घेतलेल्या अतिरेकी दोन दिवसात मारले गेले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Revenge for the killing of a soldier in 24 hours; 12 terrorists killed in 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.