शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

मंत्री करतात साडेसहा तास कारप्रवास, ज्योतिषाच्या सल्ल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2018 5:52 AM

कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री एच.डी. रेवण्णा यांना अद्याप हवे ते सरकारी निवासस्थान न मिळाल्याने ते रोज होळेनरसीपूर ते बंगळुरू असा कारने प्रवास करीत आहेत.

बंगळुरू : कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाममंत्री एच.डी. रेवण्णा यांना अद्याप हवे ते सरकारी निवासस्थान न मिळाल्याने ते रोज होळेनरसीपूर ते बंगळुरू असा कारने प्रवास करीत आहेत. रोज येण्याजाण्यात त्यांना ३६0 किलोमीटरहून अधिक अंतर कापावे लागत आहे. ते बंगळुरूमध्ये स्वत:चे घर विकत घेऊ शकतात. पण स्वत:च्या मालकीच्या घरात तुम्ही राहू नका, असा सल्ला त्यांना ज्योतिषाने दिला आहे.एच.डी. रेवण्णा हे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे मोठे बंधू आहेत. तुम्ही सरकारी बंगल्यात राहण्यात अडचण नाही, पण स्वत:च्या घरात राहता कामा नये, असा ज्योतिषाचा अजब सल्ला पाळण्यासाठी ते रोज साडेसहा तास प्रवासात घालवत आहेत. स्वत:च्या घरात तुम्ही झोपलात तर काही वाईट घडू शकते, असे ज्योतिषाचे म्हणणे आहे. तसे होण्यापेक्षा साडेसहा तासांचा प्रवास त्यांना मान्य आहे, असे दिसते.हा प्रवास टाळायचा तर त्यांना सरकारी बंगला मिळायला हवा. तो लगेच मिळू शकतो. पण त्यांना जो बंगला हवा आहे, तो सध्या आहे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री महादेवप्पा यांच्याकडेच आहे. तो रिकामा करण्यास त्यांनी तीन महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यामुळे आणखी तीन महिने रेवण्णा यांना रोज साडेसहा तास प्रवास करावा लागेल, असे सांगण्यात येत आहे. ते रोज होळेनरसीपूर गावातील घरीच झोपायला जात आहेत. रोज इतका प्रवास करण्यासाठी रेवण्णा सकाळी ५ वाजता उठतात. आधी पूजा करतात, मग चहा-नाश्ता झाल्यानंतर ८ वाजेपर्यंत मतदारसंघातील लोकांना भेटतात, त्यांच्या तक्रारी जाणून घेतात. मग ८ वाजता बंगळुरूला जायला निघतात. बंगळुरूत कार्यालयातील कामे आटोपून ते रात्री ९ वाजता पुन्हा गावाकडे निघतात. घरी पोहोचपर्यंत मध्यरात्र झालेली असते. तरीही आपले भले व्हावे, काही वाईट होऊ नये, यासाठी ते ज्योतिषाच्या सल्ल्यानुसारच वागत आहेत. याला अंधश्रद्धा म्हणायचे की आणखी काही? (वृत्तसंस्था)महादेवप्पांना तो बंगला लकीज्यांच्याकडे असलेला बंगला रेवण्णा यांना हवा आहे, ते महादेवप्पा २०१३ पासून तेथे राहत आहेत. हा बंगला आपल्यासाठी भाग्यशाली ठरला होता. या बंगल्यामुळे आपण मंत्री म्हणून स्वत:ची छाप उठवू शकलो, असे महादेवप्पा सांगतात.

टॅग्स :Karnatakकर्नाटक