शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील अवैध बांधकामे नियमित करण्यास प्रतिबंध

By admin | Updated: April 14, 2015 00:06 IST

हायकोर्टाचे आदेश : राज्य शासनाला चपराकमुंबई : मुंबईतील सुमारे ५६ हजार अवैध बांधकाम नियमित करण्यासंदर्भातील प्रस्तावावर कोणताही निर्णय घेऊ नका, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिले.राजेंद्र ठक्कर यांनी त्याबाबत जनहित याचिका केली आहे. मुंबईतील अवैध बांधकामे नियमित करणार असल्याची घोषणा सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार सुमारे ...


हायकोर्टाचे आदेश : राज्य शासनाला चपराक
मुंबई : मुंबईतील सुमारे ५६ हजार अवैध बांधकाम नियमित करण्यासंदर्भातील प्रस्तावावर कोणताही निर्णय घेऊ नका, असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाला दिले.
राजेंद्र ठक्कर यांनी त्याबाबत जनहित याचिका केली आहे. मुंबईतील अवैध बांधकामे नियमित करणार असल्याची घोषणा सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यानुसार सुमारे ५६ हजार अवैध बांधकामे नियमित होणार आहे.
मात्र अवैध बांधकामे नियमित करण्याबाबत उच्च न्यायालयानेच २००४ मध्ये एक निकाल दिला आहे. त्यात न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. त्यामुळे सरसकट बांधकामे नियमित न करता मार्गदर्शक तत्त्वानुसार नियमन झाले पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
न्या. अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीताराम कुंटे समितीचा महापालिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा अहवाल तत्त्वत: स्वीकारण्याचा निर्णय २२ मार्चला घेतला होता. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे ५६ हजार बांधकामे नियमित होण्याची शक्यता होती. पण हायकोर्टाच्या दणक्याने सरकारला दोन पावले मागे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
...................................
मुंबईतील बेकायदा बांधकामांची आकडेवारी आघाडी सरकारने २०१३ च्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे मांडली होती. शहरातील ५५ हजार ९७२ अनधिकृत बांधकामांपैकी ५१ हजार ७४४ बांधकामांवर कारवाई झाली. ४ हजार २२८ बांधकामांवरील कारवाई प्रलंबित असल्याचे त्यात नमूद केले होते. दुसरीकडे मुंबई शहरासह उपनगरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. मात्र राजकीय दबावासह ही प्रकरणे न्यायालयात दाखल झाल्याने बेकायदा बांधकांना अभय मिळते. परिणामी अशा अनधिकृत बांधकांना नोटीस बजाविण्याशिवाय महापालिका प्रशासनाला काहीच करता येत नाही.
...................................
महापालिकेची यंत्रणा तोकडी
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे समितीने राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे नियमित करण्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करत एकप्रकारे त्यांना अभयच देण्याचा प्रयत्न केला होता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबईमधील बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा नेहमीच तोकडी पडते. मात्र मध्यंतरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने महापालिकेच्या महासभेत बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी थेट उपग्रहाच्या मदतीबाबतचा एक निर्णय घेण्यात आला होता. शिवाय यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करून तो शासनाकडेदेखील पाठविण्यात आला होता. उपग्रहामुळे शहर आणि उपनगरांतील बेकायदा बांधकामांवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. कोणत्याही परिसराचे छायाचित्र मिळवणे आणि तेथे बेकायदा बांधकाम होत असल्याचे आढळल्यास त्यावर कारवाई करणे शक्य होणार असल्याचे सुतोवाच महापालिका प्रशासनाने केले होते.
...................................
कुंटे यांनी सादर केलेला अहवाल मुख्यमंत्र्यांनी विधी व न्याय विभाग आणि महसूल खात्याकडे अभ्यासासाठी पाठविला आहे. महापालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेले आदेश व अहवालातील शिफारशी यांचा अभ्यास केल्यानंतर कायद्याच्या चौकटीत बसवून जी बांधकामे नियमित करणे शक्य आहे, ती नियमित करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. पण आता हायकोर्टाच्या आदेशाने त्याला खिळ बसणार आहे.
...................................