शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

रेस्टॉरन्टला भीषण आग, आत झोपलेल्या पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 7:57 AM

एका रेस्टॉरन्टला लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

बंगळुरू - बंगळुरुत एका रेस्टॉरन्टला लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  बंगळुरूत एका  रेस्टॉरन्टला अचानक भीषण आग लागली. यामध्ये आत झोपलेल्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. बंगळुरुतील भाजी मंडतील कुंभारा सांघा बिल्डिंगमधील तळघरामध्ये असेलेल्या कैलास बार आणि रेस्टॉरन्टला आग लागली होती. आज पहाटे 2: 30 वाजता ही दुर्देवी ही घटना घडली. 

होरपळून मृत्यू झालेले हे सर्व कर्मचारी हॉटेल बंद झाल्यानंतर तिथेच झोपले होते. पण अचानक आग लागल्याने त्यांना बचावाची कुठलीच संधी मिळाली नाही. यात या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. आगीची माहिती समजताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तोपर्यंत आग पसरली होती. बेंगळुरुतील कुंभारा संघ इमारतीत कैलास बार आणि रेस्टॉरन्ट आहे. नेहमीप्रमाणे रात्री उशिरा बार बंद केल्यानंतर कर्मचारी तिथेच झोपी गेले होते. रात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागली.

 

 या घटनेबद्दल माहिती मिळाल्यानंतर तातकाळ घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या गाड्या आणि बंब दाखल झाले. पहाटे पाच वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तोपर्यंत आत झोपलेल्या पाच जणांचा या अग्नितांडवामध्ये मृत्यू झाला. ही आग नेमकी कशामुळं लागली हे अद्याप समजू शकले नाही. 

 

ज्यावेळी रेस्टॉरन्टला आग लागली त्यावेळी काही कर्मचारी आतमध्ये झोपले होते. आग लागल्यानंतर ते रेस्टॉरन्टमध्ये अडकले गेले. आगीच्या धुरामध्ये घुसमटून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यामध्ये स्वामी (23), प्रसाद (20), मंजूनाथ (45), किर्ती (24) आणि महेश (35) यांचा समावेश आहे. 

( आणखी वाचा वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 118 मुंबईकरांचा गेला बळी  )

दरम्यान, कैलास बार आणि रेस्टॉरन्ट हे आरवी दयाशंकर यांच्या नावावर आहे. या अग्नितांडवामध्ये किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकले नाही.  

टॅग्स :fireआग