शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

देशातील साखर उद्योगामधील संशोधन अत्यंत कमकुवत : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 8:38 PM

संशोधनामधे अधिक गुंतवणुक करण्याची गरज

ठळक मुद्देतीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साखर परिषद रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची उत्पादकता संपुष्टात येण्याचा धोकाउत्पादकता वाढविणे, इथेनॉल आणि उर्जा क्षेत्रावर भर हवा

पुणे : देशाची भविष्यातील उर्जेची आणि साखरेची मागणी वाढविण्यासाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणता येणार नाही. त्यासाठी साखरेची उत्पादकता आणि साखर उतारा वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र, सध्या साखर उद्योगातील संशोधन अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे संशोधनामधे अधिक गुंतवणुक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केले. मांजरी येथे व्हीएसआयच्या वतीने दुसरी तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ. जोस आॅरिव्ह, पंजाबचे सहकार मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मृद् व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त सौरभ राव, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जयप्रकाश दांडेगावकर, कल्लपा आवाडे या वेळी उपस्थित होते. ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्राझिल, चीन, इजिप्त, फ्रान्स, इंडोनेशिया, आयर्लंड, जपान, फिलिपिन्स, स्पेन, श्रीलंका, थायलंड, दक्षिण अफ्रिका, इस्त्राईल, युनायटेड किंगडम, सुदान अशा विविध २० देशातील ३४हून अधिक वक्ते सहभागी झाले आहेत. रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीची उत्पादकता संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यासाठी रासायनिक, सेंद्रीय आणि जैव खतांचा एकात्मिक वापरावर भर द्यायला हवा. या शिवाय दरवर्षी ३० टक्के बियाणे बदलत राहिले पाहिजे. जैव तंत्रज्ञान, नॅनॉ तंत्रज्ञान, मॉलेक्युलर तंत्रज्ञानाचा वापर करुन दुष्काळ, जमिनीतील क्षारता, रोगराईशी सामना करणाºया पिकांच्या जाती शोधाव्यात, असा सल्ला पवार यांनी दिला.  

‘‘देशातील साखरेची मागणी २०२५ पर्यंत तीनशे ते ३३० लाख लाख टन असेल. ही मागणी पूर्ण करण्यासाठी साखरेची उत्पादकता वाढवायला हवी. सध्या दरहेक्टरी ७० टन असलेले उत्पादन अडीचशे टनांवर जायला हवे. सरासरी साखर उतारा साडेदहा टक्क्यांवरुन साडेअकरा ते बारा टक्क्यांदरम्यान असायला हवा. साखर संस्था, कारखाने आणि उत्पादकांनीही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा. संशोधनातील गुंतवणूक वाढवायला हवी. तरच साखर उद्योग भविष्यातील साखर, इथेनॉल आणि उर्जेची मागणी देखील पुरवू शकेल.’’ -शरद पवार.............‘‘साखर उत्पादनामधे ब्राझिलपाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. आता निर्यातीतही भारत आपले स्थान निर्माण करीत आहे. थायलंड नंतर भारताचा निर्यातीत तिसरा क्रमांक येतो. मात्र, या पुढील काळात फुटबॉलमधेच नव्हे तर, साखरेतही भारत-ब्राझिल लढत पहायला मिळेल.’’ -डॉ. जोस आॅरिव्ह  

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारSugar factoryसाखर कारखानेResearchसंशोधनFarmerशेतकरी