प्रजासत्ताकदिनी बराक ओबामा प्रमुख पाहुणे

By Admin | Updated: November 22, 2014 02:44 IST2014-11-22T02:44:03+5:302014-11-22T02:44:03+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आगामी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनास प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.

Republican President barack Obama chief guest | प्रजासत्ताकदिनी बराक ओबामा प्रमुख पाहुणे

प्रजासत्ताकदिनी बराक ओबामा प्रमुख पाहुणे

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आगामी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनास प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निमंत्रण अमेरिकेने स्वीकारल्याचे व्हाइट हाऊसच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
येत्या प्रजासत्ताक दिनी आपला हा मित्र सोबत असावा अशी माझी इच्छा आहे , अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे टिष्ट्वट मोदी यांनी केले होते. त्यानंतर ओबामा यांनी या निमंत्रणाचा स्वीकार केला. परिणामी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला पहिल्यांदाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Republican President barack Obama chief guest