शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

Anand Mahindra : मोदी सरकारच्या 'या' कामाचं केलं कौतुक; चित्ररथ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, 'Game Changer'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 8:01 PM

आनंद महिंद्रांनी ट्वीटरवरुन केलं कौतुक. पाहा काय म्हणाले...

Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे (Mahindra and Mahindra Group) प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरवर ७३व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या एका चित्ररथाचा फोटो शेअर केलाय. त्यांच्या आवडीच्या चित्ररथाच्या फोटोसह त्यांनी सुंदर पोस्टसह शेअर केली आणि सरकारच्या कामाची प्रशंसाही केली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त, आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं आणि लोकांना त्यांच्या आवडत्या चित्ररथाबद्दल विचारलं. "आम्ही लहानपणी २६ जानेवारीची परेड पाहायचो, तेव्हा आम्ही सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी आपापसात मतदान करायचो. या वर्षी तुम्ही कोणाला मतदान करता हे जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे. माझ्या आवडीचा चित्ररथ नुकताचं गेला असं वाटतं," असं महिंद्रा यांनी नमूद केलं होतं.'जल जीवन मिशन'ला पसंतीआपल्या पहिल्या पोस्टनंतर काही तासांनी महिंद्रा यांनी आपल्या आवडत्या चित्ररथाचा व्हिडीओ शेअर केला. त्यांना जल जीवन मिशनचा चित्ररथ आवडला. माझं मत या चित्ररथाला, कारण जल जीवन मिशन प्रत्येकाच्या जीवनात गुणवत्तापूर्ण बदल करण्यासाठी मैलाचा दगड ठरू शकतो. लडाखमध्येही १४ हजार फुटांच्या उंचीवर भारत चीन सीमेजेवळ उणे २० डिग्री तापमानातही २४*७ पाणी मिळेल, असं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, जल जीवन मिशन सुरू करण्याची घोषणा केली होती. २०२४ पर्यंत गावागावांमध्ये प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणं हे या मागील उद्देश होतं.

 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राNarendra Modiनरेंद्र मोदीRepublic Dayप्रजासत्ताक दिन