शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

Republic Day 2018 : 'त्या' वादानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा केरळमध्ये केलं ध्वजारोहण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 1:20 PM

प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये ध्वजारोहण केले. mohan bhagwat hoists flag in a school in kerala

पलक्कड - प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये ध्वजारोहण केले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येथे जोरदार तयारी करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या वर्षीदेखील 15 ऑगस्ट दिनी भागवत यांनी एका शाळेमध्ये तिरंगा फडकावला होता, मात्र यावेळी त्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात आल्यानं प्रचंड गोंधळ झाला होता.   

यावेळीदेखील भागवत यांच्या दौऱ्याच्या बरोबर आधी केरळ सरकारनं एक परिपत्रक जारी केले होते. राज्यात सर्व सरकारी कार्यालयं, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण वेगवेगळ्या विभागातील अध्यक्ष करतील, असे निर्देश जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे देण्यात आले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या आताच्या नियम आणि निर्देशांच्या आधारावर संबंधित निर्देश जारी करण्यात आले आहेत आणि यामध्ये नवीन असे काहीही नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे.  

 

केरळ दौ-यावर जाण्यापूर्वी गुरुवारी मोहन भागवत यांचे मुंबईत आयएमसी चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिजच्या वतीने डॉ. भागवत यांचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सभागृहात ‘राष्ट्रीयत्व आणि व्यावसायिक नीतिमत्ता’ या विषयावर व्याख्यान झाले.   ‘आम्ही काही करू शकत नाही’ या पराभूत मानसिकतेतून भारतीय समाज बाहेर आला आहे. आमचा इतिहास, शौर्य, आमचे गुणविशेषांच्या सत्त्वावर इंग्रजांनी घाला घातला. आज ते पुन्हा जागृत झाले आहे. आम्ही करू शकतो; नव्हे आम्हीच करू शकतो हा भाव निर्माण झाला आहे. सीएसआर ही संकल्पना आज कायद्याने आणली गेली असली तरी ती भारतीय समाजात फार पूर्वीपासून आहे. आपल्यासोबतच आपल्या समाजाची समृद्धी साधली जावी, हेच आमचा व्यापारधर्म सांगत असल्याचे भागवत म्हणाले.

म्हणून जपान महासत्ता-देशभक्ती, सर्व समाज एक परिवार असल्याची भावना, आर्थिक प्रगतीसाठी कुठलेही साहस करण्याची तयारी आणि विकासासाठी जोखीम पत्करण्याची तयारी यामुळे जपान महासत्ता बनू शकला. हे उदाहरण आमच्यासमोर आहे, असे सरसंघचालक म्हणाले. 

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघkeralकेरळ