वारंवार माफी मागितल्याने कारवाईपासून वाचता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने काँग्रेसच्या बड्या नेत्याला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 16:23 IST2024-01-04T16:21:20+5:302024-01-04T16:23:01+5:30
Supreme Court News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या वडिलांच्या नावावरून अपमानास्पट विधान केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना सर्वोच्चा न्यायालयात मोठ धक्का बसला आहे.

वारंवार माफी मागितल्याने कारवाईपासून वाचता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने काँग्रेसच्या बड्या नेत्याला फटकारले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या वडिलांच्या नावावरून अपमानास्पट विधान केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना सर्वोच्चा न्यायालयात मोठ धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने कथित वादग्रस्त टिप्पणी केल्याने काँग्रेसचे प्रवक्त पवन खेरा यांच्याविरोधात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेरा यांना खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.
पवन खेरा यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अहालाबाद उच्च न्यायालयाने पवन खेरा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआर रद्द करण्यास नकार दिला होता. पवन खेरा यांनी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने पवन खेरा यांच्याविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावेळी पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण नाव घेताना त्यांच्या वडिलांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला होता. त्यानंतर चूक दुरुस्त करताना खेरा यांनी पुन्हा एकदा मोदींच्या वडिलांचं नाव चुकीचं उच्चारत टोला लगावला होता. या वक्तव्यावरून मोठा वाद झाला होता. तसेत भाजपाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पवन खेरा यांनी अदानी समुहाशी संबंधित विवादावरून सरकारवर टीका करताना हे विधान केले होते.