दिल्लीचे नामांतर इंद्रप्रस्थ करा; विहिंपची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 12:55 IST2025-10-21T12:55:25+5:302025-10-21T12:55:54+5:30
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून ते इंद्रप्रस्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची मागणी केली आहे.

दिल्लीचे नामांतर इंद्रप्रस्थ करा; विहिंपची मागणी
नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीचे नामांतर करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. राष्ट्रीय राजधानीला तिचा प्राचीन इतिहास व संस्कृतीशी जोडण्यासाठी दिल्लीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ ठेवण्याची मागणी विहिंपने एका पत्राद्वारे दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांच्याकडे केली आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून ते इंद्रप्रस्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याची मागणी केली आहे. दिल्ली रेल्वे स्थानक व शाहजहानाबाद विकास बोर्डाचे नामांतर करून ते इंद्रप्रस्थ ठेवण्याची मागणी आहे. दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करावे, जेणेकरून राजधानीचे नाव प्राचीन इतिहास व संस्कृतीशी जोडले जाऊ शकेल, असे विहिंपचे दिल्ली प्रांत सचिव सुरेंद्र कुमार यांनी मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.